Breaking News
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रक्रिया केलेल्या अन्नाची संस्कृती दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवर आपण अवलंबून रहात आहोत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि ते जसजसे मोठे होत जातात, तसतसं गैर-संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे पालकांचं टेन्शनही थोडं वाढलं आहे. त्यामुळेच प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या पाकिटावर चरबी, मीठ, साखर इत्यादींची माहिती स्पष्टपणे आणि ठळकपणे लिहिली जावी, असं देशव्यापी सर्वेक्षणात सहभागी 80 टक्के पालकांनी सांगितलं.
हे सर्वेक्षण अन्नाविषयी जागृती करणार्या ईजीपीपी म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नन्स पॉलिसी अँड पॉलिटिक्स या एनजीओने केलं आहे. मीठ आणि साखरेचं अतिसेवन केल्याने होणार्या आरोग्याच्या हानीबाबत पालक अधिक जागरूक झाल्याचं या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार वाढवण्यात प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा मोठा हातभार आहे, हे त्यांना समजू लागलं आहे. देशात विकल्या जाणार्या बहुतेक पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये विविध घटकांचं प्रमाण नमूद केलेलं नाही. याबद्दल पाकिटावर काही माहिती दिली असली तरी ती इतकी अस्पष्ट असते की सामान्य ग्राहकांना समजूशकत नाही.
2017 च्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अहवालानुसार, देशात दर वर्षी 17 लाख लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू होतो. याशिवाय, 20 वर्षांमध्ये भारतात अकाली मृत्यू 59 टक्क्यांनी वाढले आहेत. अकाली मृत्यू झालेल्यांची संख्या 1990 मध्ये 23.2 दशलक्ष होती. 2010 मध्ये ती 37 दशलक्ष झाली. असं असूनही आपल्या दैनंदिन आहारातल्या साखर, मीठ आणि अनसॅच्युरेटेड फॅटच्या वापराचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. आपला आहार प्रक्रिया केलेल्या अन्न उद्योगाद्वारे नियंत्रित केला जात आहे आणि अशा अस्वास्थ्यकर अन्न उत्पादनांना प्रोत्साहन दिलं जात आहे. सर्वेक्षणानुसार, 80 टक्के पालकांच्या मते अन्न प्रक्रिया कंपन्यांना पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवर साखर, चरबी आणि मीठ पातळी ठळकपणे प्रदर्शित करणं बंधनकारक असावं. सर्वेक्षणात जवळपास 60 टक्के पालकांनी चिंता व्यक्त केली, की बाजारात पॅकेज्ड जंक ङ्गूड उत्पादनांची संख्या वाढत आहे, ज्यांची विक्री आक्रमक आणि अनियंत्रित पद्धतीने केली जात आहे.
कुपोषित मुलांसाठी हवामान बदलाचं आव्हान दुहेरी आहे. सर्वेक्षणानुसार 77 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की मीठ, साखर यासारख्या हानिकारक पदार्थांशी संबंधित माहिती, सरकारने बंधनकारक केल्यास आणि ते अन्न उत्पादनांवर सोप्या पद्धतीने प्रदर्शित केल्यास लोकांना आरोग्यदायी पर्याय स्वीकारण्यास प्रवृत्त केलं जाईल. सर्वेक्षण केलेल्या 62 टक्क्यांहून अधिक पालकांनी उच्च चरबी, मीठ आणि साखर असलेले खाद्यपदार्थ कायमचे सोडून देण्याची तयारी दाखवली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai