12 वर्षाखालील मुलांना कोरोनाची लस मिळणार नाही
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 09, 2022
- 725
नवी दिल्ली ः 12 वर्षांखालील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार नाही, असा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला. मात्र, याबाबत अद्याप कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या देशात 12 वर्षांखालील मुलांना ही लस दिली जात नाही. नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन’च्या मतानुसार फक्त गंभीर आजार असलेल्या बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ही लस द्यावी. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ आणि बायोलॉजिकल-ई’ या दोन लस निर्मात्या कंपन्यांनी 12 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली आहे. मुलांवरील चाचण्यांचे निकालही कंपन्यांनी सरकारला कळवले आहेत. संक्रमित मुलांमध्ये गंभीर लक्षणं नसतात. देशात 12 ते 14 वर्षं वयोगटातल्या 16 कोटी मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. आरोग्य मंत्रालयाने या प्रस्तावावर तज्ज्ञांशी चर्चा केली. यामध्ये आढळून आलं की देशात कोरोनाच्या तिन्ही लहरींमध्ये 12 वर्षांखालील मुलांना संसर्ग झाला; परंतु त्यांच्यात गंभीर लक्षणं दिसून आली नाहीत. त्यामुळे त्यांचं लसीकरण करणं आवश्यक नाही.
देशात 16 मार्चपासून 12 ते 14 वर्षं वयोगटातल्या मुलांना ही लस दिली जात आहे. 1.6 कोटी मुलांना पहिला डोस आधीच मिळाला आहे. त्याच वेळी, 15 ते 17 वर्षं वयोगटातल्या पाच कोटी 71 लाख मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते मुलं संसर्गाने आजारी पडत नाहीत. दिल्ली एम्स’च्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे डॉ.संजय राय म्हणाले की मुलांना लस देण्यापूर्वी शास्त्रीय आधार स्पष्ट व्हायला हवा. जगात कुठेही लहान मुलांना लसीची गरज नाही. कारण लस संक्रमणाच्या तीव्रतेपासून संरक्षण करते, संसर्गापासून नाही. आतापर्यंत मुलांमध्ये संसर्गाची गंभीर लक्षणं दिसून आलेली नाहीत. कोरोनामुळे मुलांचा मृत्यूही जवळपास शून्य आहे. त्यामुळे त्यांचं लसीकरण करणं योग्य होणार नाही. आयसीएमआर’चे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले की, 12 ते 14 वर्षे वयोगटातल्या गंभीर आजार असलेल्या मुलांना ही लस दिली पाहिजे. बाकीच्या मुलांना त्याची गरज नाही. असं असलं तरी, हे जवळजवळ स्पष्ट आहे की लस संक्रमणाला प्रतिबंध करत नाही; परंतु संसर्ग झाल्यानंतर रोगाची तीव्रता कमी करते. मुखवटे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात. दिल्ली एम्स’च्या मेडिसिन विभागातले सहयोगी प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य जीवन पुन्हा रुळावर येत आहे, लोक न घाबरता जगू लागले आहेत; परंतु गर्दीच्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलमध्ये मुखपट्टी घातली पाहिजे. मुखपट्टी आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते. बहुतेक लोकांनी लस घेतली आहे. तरीही, कोविडयोग्य वर्तन राखलं पाहिजे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai