पथनाट्यातून केली मतदान जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 19, 2024
- 285
उरण ः उरण कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मधुबन कट्ट्यावर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात 17 एप्रिल 2024 रोजी किशोर पाटील लिखित, दिग्दर्शित मतदान करू या पथनाट्याचे उरण शेवा केंद्राच्या शिक्षकवृदांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक अशोक म्हात्रे होते.
यावेळी चंद्रकांत मुकादम, प्रकाश पाटील, देवदत्त सूर्यवंशी,एन.एम. पाटील, नारायण भोईर,मिरा ब्रीद यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नृत्यदिग्दर्शक अमृत म्हात्रे, जलतरणपटू सारा पाटील, जयदास पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कविसंमेलनात संजय होळकर, अनुप शिवकर, मच्छिंद्र म्हात्रे, भरत पाटील,अशोक म्हात्रे,हेमंत पाटील, रामचंद्र म्हात्रे यांनी कविता सादर केल्या. सुरेख सूत्र संचालन संजय होळकर यांनी केले.
मतदान करू या पथनाट्याचे कलाकार, किशोर पाटील,महेंद्र गावंड, विश्वनाथ पाटील,नरेश म्हात्रे,संजय होळकर, शिवप्रसाद पंडित, संगिता मेहेत्रे, शर्मिला गावंड, प्रमिला गावंड, रुपाली म्हात्रे, हार्मोनियम रमण पंडित, ढोलकी देविदास पाटील, सूत्र संचालन म.का.म्हात्रे या साऱ्या कलाकारांनी उत्तम असे नाट्य सादरीकरण करुन मतदान करण्यासाठी जनजागृती केली. उत्तम असे सादरीकरण झाल्याने उपस्थितांनी या नाट्याचे, कलाकारांचे कौतुक केले. सरकारने हे सादरीकरण राज्यभर करून मतदानाचा खरा जागर जनतेत घडवावा,अशा प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी दिल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai