उरणमधील खारफुटी पुन्हा बहरली
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 29
उरण :खाडीकिनारी मातीच्या भरावाखाली गाडलेली खारफुटी पुन्हा जिवंत झाली आहे. उरण परिसरात तब्बल 10 हजार झाडे पुन्हा बहरल्याने पर्यावरणप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे.
पागोटेत एनएमएसईझेडच्या आत राष्ट्रीय महामार्ग ‘48 ब’चा विस्तार कॉरिडॉरसाठी खारफुटी नष्ट करण्यात आली होती. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी बाहेर असताना पागोटेतील सहा एकरांपेक्षा जास्त खारफुटी गाडली गेली होती. याबाबत सागर शक्ती, नॅटकनेक्ट फाउंडेशने प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या होत्या. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी समितीच्या तत्कालीन सदस्य सचिव नीनू सोमराज यांनी जागेची पाहणी केली होती. या भागात कचरा टाकणारे ट्रक थांबवण्यात आले होते. तसेच सिडको आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना कचरा साफ करून खारफुटी पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या आदेशांकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर भरती-ओहोटीच्या चक्रामुळे ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली झाडे पुन्हा बहरू लागली असून, खारफुटीला नवे अंकुर फुटल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai