मैत्रेय मोकलला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 30
उरण ः 15 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान थिम्पू, भूतान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जसखार, ता. उरण येथील मैत्रेय मोकल यांनी 93 किलो वजनी गटामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे.
टाटानगर, झारखंड येथे 18 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकले होते. त्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर त्यांची आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली होती. मैत्रेय यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले. त्यांची जिद्द, चिकाटी आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण यांनी आर्थिक निधी उपलब्ध करून मैत्रेयला मोलाचे सहकार्य केले व आशीर्वाद दिले. या स्पर्धेत जगभरातून 150 स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातून एकूण 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. मैत्रेय यांच्या या सुवर्णमयी कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai