निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 25
उरण : नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची दुसरी फेरी झाली असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी भाजपने मिशन 21 अधिक नगराध्यक्षचा नारा देत उरणच्या विकासाच्या मुद्द्यावर जोर दिला आहे. महाविकास आघाडीचा शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या सोडविण्याच्या आश्वासनावर भर आहे.
उरण नगरपरिषदेवर गेली 20 वर्षे आधी युती म्हणून आणि नंतर स्वतंत्र अशी भाजपची सत्ता आहे. विद्यमान आमदार महेश बालदी हे उरण नगर परिषेदेचे नगरराध्यक्ष होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने शिवसेना भाजप युतीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढली होती. या निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदाच थेट नगराध्यक्षपद जिंकले होते. या निवडणुकीत 18 पैकी 13 नगरसेवक निवडणूक आणले होते.
उरणच्या सर्वांगीण विकासासाठी व उरणच्या भविष्यातील विकासासाठी उरणची प्रगती साधण्यासाठी भाजपला सर्वच्या सर्व म्हणजे 21 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून देण्याचे आवाहन पक्षाने केले आहे. या निवडणुकीत आमदारांचे निकटवर्तीय आणि भाजपाचे शहर अध्यक्ष कौशिक शहा यांच्या पत्नी शोभा कोळी-शहा यांना भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरद पवार), शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नव निर्माण सेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरद पवार) पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष भावना घाणेकर यांना महाविकास आघाडीने नगरराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. त्यांनी या निवडणूकीत उरणच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्यांना वाचा फोडून त्या सोडविण्याचा निर्धार जाहीर केला आहे. यामध्ये उरण शहरातील वाढती कचरा समस्या, नादुरुस्त आणि अस्वच्छ स्वच्छतागृह, शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज, रस्त्यावरून वाहती गटारे, शहरात दिवसभर होणारी वाहतूक कोंडीची समस्या, शहरातील नागरी आरोग्य आणि अपुरी वैद्यकीय सुविधा व महिलांची असुरक्षितता या मूलभूत नागरी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
या निवडणुकीत भाजपने अनुभवी व नवखे असा मेळ घालणारे उमेदवार दिले आहेत. यात दोन उरण नगर परिषेदेचे माजी नगरराध्यक्ष आहेत. तर जवळपास 7 माजी नगरसेवकानाही उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष यांनीही नवे आणि अनुभवी अशा उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai