Breaking News
उरण ः रक्तदान शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार 21 एप्रिल 2024 रोजी नवीन शेवा, उरण येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सुमारे 100 निरंकारी भक्तांनी मानवीयतेच्या भावनेतून मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी, विले पार्ले मार्फत रक्त संकलन करण्यात आले.
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीमुळे निरंकारी भक्तगणांमध्ये मानव सेवेची भावना दृढमूल झालेली असून ते रक्तदानाव्यतिरिक्त इतर अनेक सामाजिक सेवांमध्ये निरंतर आपले योगदान देत आहेत. या शिबिरात देखील सुमारे 150 भक्तांनी रक्तदानासाठी आपली नावे नोंदवली होती यावरुन सद्गुरु माताजींच्या शिकवणूकीचा प्रभाव दिसून येतो. संत निरंकारी मंडळाचे क्षेत्रीय संचालक अशोक केरेकरजी यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक दत्ताराम पाटीलजी तसेच सेक्टर मधील सर्व ब्राँच चे मुखी, सेवादल, संचालक व अधिकारी उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाचे उरण सिटी ब्राँचचे मुखी समीर सहदेव पाटील यांनी स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वी आयोजन केले गेले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai