अजून पाच गावे होणार विमानतळबाधित
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 15, 2020
- 653
विमानतळासाठी सिडको आणखी जमीन करणार संपादित
पनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाचे काम प्रगतिपथावर आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन संपादित करूनही विमानतळ आणि त्या संबंधित कामे करण्यासाठी सिडकोला आणखी जमिनीची आवश्यकता आहे. भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील पाच गावांची आवश्यक जमीन संपादित करण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे.
11 गावे, 8 वाड्या आणि 1360 हेक्टर जमीन संपादित करून सिडको नवी मुंबई विमानतळाची उभारणी करीत आहे. दोन वर्षांपासून याचे काम सुरु आहे. उलवे टेकडी जमीनदोस्त करून नदीचा प्रवाह बदलण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले. दुसरीकडे विमानतळाचा पाया रचण्यासाठी भरावाचे कामदेखील जोमाने सुरू आहे. 1360 हेक्टर जमीन संपादित करूनही सिडकोला आणखी जमिनीची आवश्यकता आहे. यासाठी सिडकोने तांत्रिका प्रक्रिया सुरू केली आहे. 31 जानेवारी रोजी अधिसूचना काढून विमानतळ उभे राहत असलेल्या क्षेत्रातील पाच गावांची विभागवार काही हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यामध्ये ओवळे, माणघर, कोपर, पारगाव, दापोली या गावांचा समावेश आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विमानतळाच्या अनुषंगिक कामे करण्यासाठी सिडकोला या जमिनीची आवश्यकता आहे. भूसंपादन अधिनियम 2013 कलम 4प्रमाणे जमीन संपादित करण्यासाठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी (मेट्रो सेंटर 1) यांनी अधिसूचना जाहीर केली आहे. सिडकोने या जमिनीत नेमके कोणते काम करायचे आहे, याचे स्पष्टीकरण दिले नसले, तरी विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली कामे करण्यासाठी हे संपादन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जमीन संपादनासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींना लेखी पत्र देऊन शेतकर्यांना त्यांची मते एकूण घेण्यासाठी सिडको भवनात निमंत्रित केले जात आहे. ठराविक शेतकर्यांची थोडी जमीन असल्यामुळे सिडकोकडून जमीनमालक असलेल्या शेतकर्यांना बोलविले जात आहे.
पारगावचा विरोध
सिडकोने जमीन संपादित केल्यानंतर विमानतळात बाधित न झालेल्या मात्र लागून असलेल्या जागेत पारगाव आहे. पारगावातील तीन शेतकर्यांची 118 गुंठे जमीन हवी आहे. सिडको थेट शेतकर्यांना बोलवून मोबदल्याची चर्चा करीत असल्यामुळे पारगाव ग्रामसभेत सिडकोला जमीन द्यायची नाही, असा ठराव करण्यात आला. विमानळात सर्व जमीन गेलेल्या पारगावत सिडको भविष्यात काय सोयीसुविधा पुरविणार आहे, याची माहिती दिली जात नसल्यामुळे सिडकोला सहकार्य न करण्याची भूमिका ग्रामपंचायतीने रविवारी घेतलेल्या ग्रामसभेत घेतली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai