पहिल्या विमानोड्डाणापुर्वी नामकरणाची मागणी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 39
नाहीतर 22 डिसेंबरला ‘भव्य जन आक्रोश दिंडी’ मोर्चा
नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 डिसेंबर रोजी विमानाचे पाहिले उड्डाण होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र अजूनही विमानतळाचे नामकरण न झाल्याने भुमिपुत्रांमध्ये प्रचंड असंताष पसरला आहे. दिलेली आश्वासने न पाळल्याचा आरोप करत भूमिपुत्र संघटनांनी आंदोलन पुन्हा उग्र करण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर 22 डिसेंबर रोजी भूमीपुत्रांच्या संघटनांनी ‘भव्य जन आक्रोश दिंडी’ मोर्च्याचे आयोजन केले आहे. नवी मुंबईतील आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विमानतळाचे उद्घाटन आणि पहिले उड्डाण होण्यापूर्वीच या विमानतळाच्या नामकरणाबाबत निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली.
आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीवरील निर्णय मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र, उड्डाणाची वेळ जवळ आली तरीही अद्याप केंद्राकडून विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले न गेल्याने भूमीपुत्रांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. हा मुद्दा अजूनही मंत्रिमंडळ बैठकीत आला नाही, तसेच दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने भूमिपुत्र संघटनांनी आंदोलन पुन्हा उग्र करण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर 22 डिसेंबर रोजी भूमीपुत्रांच्या संघटनांनी ‘भव्य जन आक्रोश दिंडी’ मोर्च्याचे आयोजन केले आहे. 22 ते 25 डिसेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या मोर्च्यात अधिकाधिक आंदोलक आणि स्वयंसेवक सहभागी होण्यासाठी गावनिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
तसेच नागपुर येथे सुुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नवी मुंबईतील आमदारांनी आंदोलन केले तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन उद्घाटनापूर्वी राज्य सरकारने या विमानतळाला घोषित केलेले स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाषेतील ‘नामविस्तार’ व्हावा, अशी विनंती केली. विमानतळाचे पहिले उड्डाण होण्यापूर्वीच नामकरणाची अधिकृत घोषणा व्हावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री यांनी बैठकीदरम्यान “नेमके पहिल्या उड्डाणाआधी घोषणा होईल का, हे सांगता येणार नाही; मात्र पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जाईल असे आश्वासन दिले आहे” असे सांगितल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर सरकारने अधिकृत प्रेस स्टेटमेंट जारी करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या आंदोलनात गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली दि बा पाटिल यांचे पुत्र अतुल पाटील, संजीव नाईक, आमदार महेश बालदी, आमदार किसन कथोरे तसेच अनेक सदस्य उपस्थित होते.
दि. बा. पाटील यांच्या नावासाठी सर्वाधिक तळमळ प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये असून, अनेकांवर आंदोलनातील विविध प्रकरणे दाखल आहेत. ज्यांनी या आंदोलनात पाठिंबा दिला, त्यांनाच आम्हाला जाब विचारण्याचा हक्क आहे. ज्यांनी कधी या नावाचा उच्चारही केला नाही आणि इतर नावांवर आग्रही होते, त्यांना प्रश्न विचारण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला देखील ठाकूर यांनी यावेळी लगावला. तसेच नामकरणाची प्रत्यक्ष घोषणा झाल्याच्या क्षणी आम्ही उत्सव साजरा करू, असेही त्यांनी सांगितले.
- दिल्लीतही निदर्शन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली 10 डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये संसद भवनया बाहेर महाविकास आघाडीमधील खासदारांच्या वतीने निदर्शन करण्यात आले. या निदर्शन आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मविआचे खासदार सहभागी झाले होते. यावेळी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा देत त्यासंबंधी हातात आपल्या मागणीचे फलक घेऊन खासदारांनी आंदोलन केले. जोपर्यंत विमानतळाला दिबांचे नाव देणार नाही, तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरुच राहणार अशी प्रतिक्रिया खा. सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai