18 विकासकांवर बांधकाम स्थगितीची कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 60
नवी मुंबई ः महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बांधकाम व पुनर्विकासाची कामे सुरु आहेत. या कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टिंगच्या अनुषंगाने जाहीर मानक कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र याचे उल्लंघन करणाऱ्या 18 प्रकल्पांच्या विकासकांनी मानक कार्यप्रणालीतील प्रमुख बाबींची पूर्तता न केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित प्रकल्पांना महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने बांधकाम स्थगिती आदेश देण्यात आले आहेत.
सध्या हिवाळी कालावधीत वातावरणातील वाढलेले धूळ आणि धुळीचे प्रमाण लक्षात घेत त्यादृष्टीने विविध उपाययोजना करताना बांधकाम साईट्सवर प्रदूषण प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल जात असल्याबाबत प्रत्यक्ष साईट्सला भेट देऊन तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मानक कार्यप्रणालीची प्रत्यक्ष जागेवर अंमलबजावणी योग्य रितीने होत असलेबाबतची खातरजमा करणेकरिता नगररचना विभागामार्फत अभियंत्यांची विभागनिहाय पथके तयार करण्यात आली होती. या अभियंत्यांनी बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एकूण 85 प्रकल्पांच्या ठिकाणी सदर कार्यप्रणालीचे पूर्णपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार दि.26 नोव्हेंबर 2025 रोजीच्या पत्रान्वये सदर 85 प्रकल्पांच्या विकासकांना अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करणेबाबत तसेच उक्त मानक कार्यप्रणालीतील बाबींची त्वरीत पूर्तता करुन पुढील 7 दिवसात आपला खुलासा सादर करणेबाबत सूचित करण्यात आले होते. अन्यथा त्यांच्या भूखंडावर देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीस काम स्थगिती आदेश देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने एकूण 85 प्रकल्पांपैकी 18 प्रकल्पांच्या विकासकांनी मानक कार्यप्रणालीतील प्रमुख बाबींची पूर्तता न केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित प्रकल्पांना महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने बांधकाम स्थगिती ादेश देण्यात आलेले आहेत. नवी मुंबईतील पर्यावरणाविषयी जागरूक राहत वायूप्रदूषण प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलली जात असून 18 बांधकामांना दिलेले स्थगिती आदेश हा त्याच उपाययोजनांचा एक भाग आहे.
यामध्ये मयुरेश रिअल इस्टेट ॲण्ड मॅनेजमेंट, गामी एंटरप्रायजेस, टुडे रिअल बिलकॉन, शिवशक्ती कं.लि., वेलवन सिक्युरिटी प्रा.लि. / शार्मिर्थ इन्फ्रा प्रा.लि., संत ज्ञानेश्वर माऊली संस्था, दत्तगुरु सोसा., विनय आंग्रे, डिडिएसआर ड्रिमवुड सोसा., ए.के, इन्फ्रा, वषा इन्फ्रास्ट्रक्चर, प्लॅटिनम डेव्हलपर्स, सरस इन्फ्रा, शुभम सोसा, अक्षर डेव्हलपर्स, सिटी इन्फ्रा. या विकासकांचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai