Breaking News
राकोल्डने ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या’ निमित्ताने ग्राहकांना केले वीज बचतीचे आवाहन
दरवर्षी 14 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ तर 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. सर्व स्तरावरील उपभोक्त्यांना ऊर्जा बचतीचे महत्व अवगत करून देवून दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा वापर अत्यावश्यक वेळीच केला जावा या प्रमूख उद्देशामुळेच या संवर्धन दिनाचे आणि सप्ताहाचे आयोजन केले जाते.
विविध क्षेत्रामध्ये ऊर्जा संवर्धनाचा वाव आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे महत्व पाहता केंद्र शासनाने ऊर्जा संवर्धन कायदा 2001 पारित केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून ऊर्जा वापर कमी होण्यासाठी विविध योजना तयार करण्याच्या अनेक तरतूदी आहेत. ऊर्जा संवर्धनाचा प्रचार आणि प्रसार करून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे महत्व विविध घटकांना पटवून देणे हा ही या कायद्याचा आणखी एक प्रमुख भाग आहे. लॉकडाउन आणि घरून काम करण्याची सक्ती यामुळे देशात सर्वत्र घरगुती ऊर्जा वापर लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. भारतामध्ये एकूण घरगुती वीज वापरापैकी जवळपास 50% ते 60% वीज ही पंखे, टीव्ही, रेफ्रिजरेटर, एअर-कंडिशनर्स आणि वॉटर हीटर्स यासारख्या दैनंदिन वापराच्या उपकरणांसाठी वापरली जाते.
यंदा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या निमित्ताने राकोल्ड या वॉटर हीटिंग उत्पादनांच्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने ग्राहकांना विजेची बचत करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी उत्तम कामगिरी बजावणारी आणि ऊर्जा बचतीसाठी आवश्यक वैशिष्ट्ये असलेली योग्य उपकरणे घरात वापरली जावीत असेही कंपनीने सांगितले आहे. विजेचा वापर अधिक कार्यक्षम पद्धतीने करून आणि ऊर्जा बचत करण्यात सक्षम घरगुती उपकरणे वापरून आपण ऊर्जा वापरामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम कमी करू शकतो, इतकेच नव्हे तर आपल्या वीज बिलातही बचत होते. राकोल्डची सोलर वॉटर हीटिंग सिस्टिम ही आंतरराष्ट्रीय मापदंडांनुसार डिझाईन करण्यात आली असून जास्तीत जास्त ऊर्जा शोषली जावी आणि उच्च कार्यक्षमता हे तिचे प्रमुख उद्देश आहेत. यामुळे राकोल्डचे इलेक्ट्रिक स्टोरेज वॉटर हीटर श्रेणीतील सीडीआर डीएलएक्स, सीडीआर स्विफ्ट, बुओनो प्रो आणि ओम्निस हे वॉटर हीटर्स व वरीलपैकी निवडक मॉडेल्सना बीईई 5-स्टार्स रेटिंग देण्यात आले आहे, अर्थात हे प्रचंड प्रमाणात ऊर्जा बचत करण्यासाठी सक्षम आहेत.
ऍरिस्टोन थर्मो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मोहित नरूला यांनी सांगितले, हे वर्ष जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी डोळ्यात अंजन घालणारे होते, आपला निसर्ग आणि त्याच्या संसाधनांचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे ते या वर्षभरात चांगलेच जाणवले. प्रत्येक घराघरातून छोट्या-छोट्या उपाययोजना केल्या गेल्यास निसर्गावर होणारा विपरीत परिणाम टाळला जाऊ शकतो. ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जेचा सक्षम वापर यासाठी वचनबद्ध असलेल्या राकोल्डने नेहमीच उच्च तंत्रज्ञानयुक्त उत्पादने सादर केली आहेत. राकोल्डने ‘बीईई’ द ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियंसी अवॉर्ड्स हा मानाचा पुरस्कार 2010 ते 2018 अशी तब्बल नऊ वर्षे जिंकला आहे. कंपनीच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे हे फळ आहे. हे पुरस्कार ऊर्जा संवर्धनासाठीची आमची वचनबद्धता दर्शवतात.
भारतात ऊर्जा सक्षमतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ऊर्जा संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयांतर्गत ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियंसी अर्थात बीईईची स्थापना करण्यात आली आहे. विविध उद्योगक्षेत्रांमध्ये ऊर्जा संवर्धनासाठी केले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि त्यामध्ये मिळवलेले यश तसेच बीईई स्टार लेबल्ड उपकरणांच्या उत्पादकांना बीईईतर्फे पुरस्कार दिले जातात. बीईई पुरस्कार म्हणजे ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा सक्षमतेप्रती उद्योगांच्या वचनबद्धतेचा सन्मान आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai