शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनतर्फे मोफत वैद्यकीय शिबिर
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 23, 2025
- 28
नवी मुंबई ः कोपरखैरणे सेक्टर 10 येथील सुयश सोसायटी, येथे शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्यावतीने एक भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिराचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा रजनी ताजणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या उपक्रमासाठी एल ॲण्ड टी हेल्थ केअर तसेच ब्रह्माकुमारीज ग्लोबल हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिरामध्ये 100 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.
वैद्यकीय शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब तपासणी, प्राथमिक उपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य सल्ला दिला. आजच्या जीवनशैलीत अनेक नागरिक आर्थिक अडचणी व वेळेअभावी आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत मोफत वैद्यकीय शिबिरे समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. यामुळे आजारांचे लवकर निदान होते, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढते आणि गरजू घटकांना दिलासा मिळतो. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवक स्वस्तिका सिंग, रक्षित ताजणे, लावण्या दिवे आणि कार्तिक पटाडे यांनी अतिशय शिस्तबद्ध व सेवाभावी वृत्तीने कार्य केले. रुग्ण नोंदणी, व्यवस्थापन व मार्गदर्शनात त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. हा उपक्रम सखी स्वयंरोजगार बचत गट यांच्या सहकार्याने राबवण्यात आला. या गटाच्या अध्यक्षा शबाना खान आणि मंतशा खान यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व या शिबिरामुळे समजल्याचे मत व्यक्त केले, नागरिकांनी शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन व सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे सामान्य माणसाला मोठा आधार मिळतो, अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
या यशस्वी उपक्रमाबद्दल रजनी ताजणे यांनी एल ॲण्ड टी हेल्थ केअर, ब्रह्माकुमारीज ग्लोबल हॉस्पिटल, सखी स्वयंरोजगार बचत गट, स्वयंसेवक तसेच सर्व उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.भविष्यातही समाजाच्या आरोग्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai