21 लाखांचे अंमली पदार्थ जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2025
- 45
नवी मुंबई : नवी मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कोकण कृती विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) मोठी कारवाई करत मेफेड्रॉन आणि एमडीएमए या घातक अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत टास्क फोर्सने नायजेरियन नागरिकाला अटक करुन त्याच्याकडून तब्बल 21 लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.
15 डिसेंबर रोजी रात्री 9.25 वाजण्याच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधिकारी आणि अंमलदार वाशीमध्ये गस्तीवर असताना गेलजीभाई गोपाळ पटेल चौक, पामबीच रोड येथे परदेशी व्यक्ती ॲक्टिव्हा दुचाकीजवळ संशयास्पदरित्या उभा असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांची चाहुल लागताच त्याने ॲक्टिव्हा घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पाठलाग दरम्यान आरोपीने रस्त्यालगतच्या गटारात उडी मारुन पलायन केले होते. आरोपी पसार झाला असला तरी पोलिसांनी त्याच्या ॲक्टिव्हाची झडती घेतली असता ॲक्टीवाच्या डिक्कीतून सुमारे 17 लाख रुपये किंमतीची 70 ग्रॅम वजनाची एमडी पावडर तसेच 120 एमडीएमए गोळ्या असा अंंमली पदार्थांचा साठा सापडला. टास्क फोर्सने सदर अंमली पदार्थाचा साठा जप्त करुन पळून गेलेल्या परदेशी नागरिकाविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्र्सच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने फरार आरोपीचा शोध घेतला असता, तो कोपरखैरणे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर टास्क फोर्सने कोपरखैरणे येथील अनेय किंगस्ले चिनेडु (40) या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. चौकशीअंती कारवाई दरम्यान पळून गेलेला आरोपी तोच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर टास्क फोर्र्सच्या पथकाने सदर आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून सुमारे 4 लाख रुपये किमंतीची 14 ग्रॅम एमडी पावडर तसेच 23 ग्रॅम वजनाच्या 40 एमडीएमए गोळ्या असा अतिरिक्त अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. सदरचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्र्सचे पोलीस उपअधीक्षक रामचंद्र मोहिते दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai