शिंदेसेनेची समन्वय समिती जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2025
- 53
समिती मित्र पक्षासोबत जागा वाटप व इतर रणनिती आखणा
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पक्षाची समन्वय समिती जाहीर केली. ही समिती जागा वाटपासोबत पक्षाचे उमेदवार, जाहीरनामा, रणनिती आखणीवरही चर्चा करेल असे ठरविण्यात आले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने गुरुवारी सकाळी ही समिती जाहीर केली आहे.
महापालिका निवडणुकांची तारीख निश्चित झाल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्यासह त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू केला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत नुकताच ठाकरे गटाच्या तीन तर काँग्रेसच्या दोन अशा एकूण पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशानंतर येत्या 21 तारखेला ऐरोली येथे एकनाथ शिंदे पक्षाचा मेळावा घेणार आहेत. भाजपबरोबर युती करायची की नाही याविषयी अजूनही नवी मुंबईत स्पष्टता नसल्याने शिंदे यांच्या उपस्थित होणाऱ्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपबरोबर चर्चा करण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये निवडणुक मुख्य समन्वय समितीत खासदार नरेश म्हस्के, उपननेते विजय नाहटा, उपनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख द्वारकनाथ भोईर, बेलापूर जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, जिल्हा संपर्क नेते अंकुश कदम, शहरप्रमुख विजय माने तसेच मनोज हळदणकर यांची निवड करण्यात आली आहे. महिला नेत्या म्हणून सरोज पाटील आणि शितल कचरे यांचीही निवड करण्यात आली आहे.
जागा वाटपबाबत चर्चा करून सर्वांच्या संमतीने इच्छुक उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड करणे, प्रचार यंत्रणेचे नियोजन करणे, निवडणुकीसंदर्भात मतदान व मतमोजणीपर्यंत सर्वांच्या संमतीने पक्षाच्या हिताचे निर्णय घेणे अशी समितीची जबाबदारी असणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai