व्हॅली गोल्फ कोर्समध्ये रंगली आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2025
- 64
व्यावसायिक गोल्फचा ऐतिहासिक टप्पा; वीर अहलावतला विजेतेपद
नवी मुंबई ः गुरुग्राम येथील गोल्फपटू वीर अहलावत यांनी नवी मुंबईतील खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लार्सन ॲण्ड टुब्रो प्रस्तुत सिडको ओपन 2025 गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
सिडको आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (पीजीटीआय) यांनी संयुक्तरीत्या लार्सन ॲण्ड टुब्रो प्रस्तुत सिडको ओपन 2025 या गोल्फ सामन्यांकरिता रु. 1 कोटीचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. हा स्पर्धा दि.16 ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये नवी मुंबईतील भव्य खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे पार पडली. या सामन्यांमध्ये 126 व्यावसायिक खेळाडू सहभागी होऊन प्रत्येकी 18 होल्सकरिता स्ट्रोक-प्ले पद्धतीने चार फेऱ्यांमध्ये सामने खेळविले गेले. वीर अहलावत यांनी अंतिम फेरीत चार-अंडर 67 अशी कामगिरी करत एकूण 14-अंडर 270 गुणांसह तीन स्ट्रोक्सच्या फरकाने स्पर्धेत विजय मिळवला. स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये ते लीडरबोर्डवर आघाडीवर होते. हा त्यांचा 2025 मधील दुसरा तसेच एकूण सहावा व्यावसायिक विजेतेपदाचा मान पटकावला. तसेच 2025 झॠढख क्रमवारीत त्यांनी 18व्या स्थानावरून 11व्या स्थानावर झेप घेतली.
बक्षीस वितरण समारंभात सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया चे अध्यक्ष कपिल देव यांच्या हस्ते विजेते वीर अहलावत यांना चषक प्रदान करण्यात आला. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, लार्सन ॲण्ड टुब्रोचे वरिष्ठ उपाध्यक्ष व विशेष कार्यप्रमुख श्री. श्रीनाथ राव तसेच झॠढख चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमनदीप जोहल उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai