निवडणुकीसाठी पालिकेची तयारी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2025
- 52
5,54,578 मतदार; 4500 कर्मचारी अपेक्षित
पनवेल ः पनवेल : राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी जाहिर करण्यात आला आहे. पनवेल महापालिकेनेही निवडणुक सुव्यवस्थीतपणे पार पडावी यासाठी नियोजन केले आहे. या निवडणुकीत 72 तृतीयपंथीयांसह 5,54,578 मतदार 661 मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक कामाकरीता 6 निवडणूक निर्णय अधिकारी, 6 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून 4500 कर्मचारी अपेक्षित असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितली.
पनवेल पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या प्रक्रियेची व तयारीची माहिती दिली. पनवेल महापालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने 20 प्रभागातील 78 जागांसाठी निवडणूक होणार असून 15 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी 6 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 6 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त अधिकाऱ्यांमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार तसेच महानगरपालिका व इतर शासकीय विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक निवडणूक विभागासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांची व्यवस्था, उमेदवारी अर्जाची छाननी, मतदान, मतमोजणी तसेच आयोगाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे अशा विविध तरतूदींवरती माहिती सांगण्यात आली.
प्रभागनिहाय अधिकारी
प्रभाग क्रमांक 1,2,3 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भारत वाघमारे (जिल्हाधिकारी पुर्नवासन, रायगड) यांची नियुक्ती केली आहे तसेच अर्चना प्रधान आणि नितीन राठोड यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग 4,5,6 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर खुटवड (उपविभागीय अधिकारी) यांची नियुक्ती केली आहे. तसेच संतोष मांढरेआणि नितीन राठोड यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग 7,8,9,10 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमित शेडगे (मुद्रांक जिल्हाधिकारी) यांची नियुक्ती केली आहे. नरेश पेढवी, विशाल हुडेकर, यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 11,12,13 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविशकुमार सोनोने (उपजिल्हाधिकारी मेट्रो) यांची नियुक्ती केली आहे. रविंद्र सानप आणि सिध्दार्थ कांबळे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग 14.15.16 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ललिता बाबर (उपायुक्त नवी मुंबई मनपा)) यांची नियुक्ती केली आहे. जितेंद्र इंगळे आणि सौरभ परभरणकर यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग 17.18 19,20 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पवन चांडक (उपविभागीय अधिकारी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत फुलपगारे आणि कविता मोकल यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai