कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्स
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 24, 2020
- 622
मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत माहिती
मुंबई : कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सतत संपर्कात आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण कसे असणार या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
देशातील काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 नोव्हेंबरला कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येऊन सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी काल एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत या दौर्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवाळीनंतर वाढताना दिसत आहे. काल राज्यात 4153 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर नवीन 3729 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 81902 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.74% झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai