5 एप्रिला 9 वाजून 9 मिनिटांनी करा दिव्यांचा झगमगाट
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2020
- 669
वीज बंद करुन घरात दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्चचा प्रकाश करा ः पंतप्रधान मोदी यांचे देशाला आवाहन
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाला प्रकाशाची ताकद दाखवून या. 5 एप्रिल, रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं मोदी म्हणाले.
130 कोटी जनतेची सामुहिक दिव्य शक्ती आपण कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र आणूया. याकरता पंतप्रधान मोदींनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता जनतेला आपली 9 मिनिटे देण्यासाठी सांगितली आहे. हे आयोजन करताना कुणीही एकत्र यायचं नाही. रस्त्यावर, गल्लीत एकत्र जमायचं नाही, असं मोदी म्हणाले. यावेळी मोदी म्हणाले की, 22 मार्चला देशवासियांनी आरोग्य कर्मचार्यांप्रती केलेल्या धन्यवादाचे अनेक देश अनुकरण करत आहेत. देश एक होऊन कोरोना विरोधात लढाई लढतोय. लोकडाऊनच्या काळात आपण एकटे नाहीत. 120 कोटी देशवासियांची ताकत आपल्या सोबत आहेत, असं मोदी म्हणाले.
ते म्हणाले की, या कोरोना महामारीच्या अंधकारात आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या कोरोना संकटाच्या अनिश्चिततेला संपवून आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवायचं आहे. 5 एप्रिलला आपल्याला कोरोनाच्या संकटाळा महाशक्तीचं जागरण करायचं आहे. 5 एप्रिल रविवारी रात्री 9 वाजता आपल्याला 9 मिनिटं मला हवी आहेत. त्यांनी सांगितलं की, या आयोजनाच्या वेळी कुणीही एकत्र यायचं नाही. आपल्या दारात, बाल्कनीत उभं राहून हे करायचं आहे, असं मोदी म्हणाले. देशातील कोट्यवधी लोक आज घरात आहेत. ते विचार करत असतील की एवढी मोठी लढाई आपण एकटं कसं लढू. लॉकडाउन असलं तरी कोणीही एकटं नाही. 120 कोटी लोकांची सामूहिक शक्ती एकत्र आहे. वेळोवेळी या सामूहिक शक्तीच्या भव्यतेचं दर्शन घडवणं आवश्यक आहे. या महामारीमुळे पसरलेल्या अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. ज्यांच्यावर जास्त संकट आलंय अशा गरीब बांधवांना आपल्याला सोबत पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला कोरोना संकटाला हरवायचं आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
काल केल्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना
पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? याच्या सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या होत्या. लॉकडाऊन संपविल्यानंतर 15 एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती भाग सुरु होतील हे पाहावे, असं मोदी म्हणाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai