यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कारासाठी अर्ज सुरु

नवी मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण नवी मुंबईतर्फे याहीवर्षी सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणार्‍या संस्था तसेच व्यक्तींचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे सन 2021-22 या पुरस्कारासाठी समाजातील मराठी, साहित्य, संक्ती तसेच कला क्रिडा याशिवाय सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक-सामाजिक विकास, कृषी, औद्योगिक समाज रचना, व्यवस्थापन, प्रशासन व पर्यावरण यापैकी कोणत्याही एका क्षेत्रामध्ये भरीव कार्य करणार्‍या संस्था तसेच व्यक्ती यांच्याकडून 21 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण नवी मुंबईतर्फे दरवर्षी समाजातील संस्था तसेच व्यक्तींना यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो. यावर्षी 25 नोव्हेंबर 2021 रोजी यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात उत्तम कार्य अथवा योगदान देणार्‍या संस्था अथवा व्यक्तीस यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार मानपत्र आणि 20 हजार रुपये रोख असा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती अथवा संस्थेने िीरोवज्ञरीपरवसारळश्र.लेा या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी केले आहे.