अखेर ठरलं... मुंबईत ठाकरे बंधुंची युती
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 24, 2025
- 27
कार्यकर्त्यांसह मराठी माणसांमध्ये जल्लोष
मुंबई ः राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून अनेक रजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. युती, आघाडी, जागावाटप याची रणनिती आखली जात आहे. परंतु या सगळ्यात केेंद्रस्थाने होते ते म्हणजे ठाकरे बंधू. अखेर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणा आज बुधवारी करण्यात आली. मुंबई आणि नाशिकसाठी शिवसेना ठाकरे गट व मनसे यांची युती झाल्याचे ठाकरे बंधूंनी मुंबईत पत्रकार परिषद घेत जाहीर केले.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीकडे अख्खा महाराष्ट आणि मराठी माणसाचे लक्ष लागले होते. यासाठी बुधवारी दुपारी 12 चा मुहुर्त निश्चित झाला आणि अखेर युतीचे घोषणा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार आहेत. या पत्रकार परिषेदपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत मुंबईच्या चिंधडड्या उडवण्याची मनसुबे दिल्लीत बसलेल्या दोन जणांकडून रचले जात असल्याची टिका करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नाव न घेता निशाणा साधला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ उद्धव यांनी घेतली. आता आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र ते एकत्र राहण्यासाठी. आता मी मराठी माणसाला सांगतो की, आता चुकाल तर संपाल, त्यामुळे तुटू नका, फुटु नका, मराठीचा वसा टाकू नका असा संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला. मराठी माणसांसाठी जे आम्ही हवे ते करु असे आश्वासन त्यांनी दिले. महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर प्रेम करणाऱ्या कुणीही आमच्या सोबत येऊ शकतात असेही सांगितले.
तर राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत पत्रकार परिषदमध्ये मराठी माणसाला साद घातली. राज ठाकरे यांनी सांगितले की, यापुर्वी मी कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे म्हटले होते. माझ्या त्या वाक्यापासून शिवसेना-मनसे एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढणार, हे आम्ही आताच सांगणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यात आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे. त्या टोळ्या राजकीय पक्षातील मुलं पळवत आहेत. शिवसेना-मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा, हे लवकरच सांगितले जाईल, असे म्हणत राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. तसेच मुंबईचा महापौर मराठीच असणार आणि तो आमचाच असणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai