30 इलेक्ट्रिक बसेसला केंद्राची मंजुरी

नवी मुंबई ः केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयाने फेम योजने अंतर्गत 30 बसेसला नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रम यांना देण्याच्या प्रसातावला नुकताच मंजुरी मिळाली आहे. लवकरच या गाड्या एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यासाठी खासदार राजन विचारे यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. 

या बसेस आपल्या लोकसभा मतदार संघातील नवी मुंबई, ठाणे व मीरा भाईंदर महापालिकेला देण्यासाठी सन 2014 पासुन पत्र व्यवहार सुरु होता. त्या नंतर केंद्र शासनाने या महापालिकेला इमेल द्वारे प्रस्ताव मागविण्यात यावा असे कळले होते. त्यानंतर महापलिकेने तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता त्याला दाद मिळत नसल्याने मध्यतरी काळात शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा व खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबई महापलिकेचे आयुक्त रामास्वामी यांची भेट घेऊन याच्या सादारीकरनाला दिल्लीला पाठविण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर नवी मुंबई शिवसेनेचे परिवहन सदस्य विसाजी लोके, समीर बागवान, राजेंद्र आव्हाड व परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी खासदार राजन विचारे यांच्या सोबत दिल्लीत अवजड उद्योग मंत्रालय विभागाचे सेक्रेटरी विश्वजित सहाय यांची भेट घेऊन या प्रसातावाचे सादरीकरण केले त्याला यश आले असून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अंनत गीते यांचे या बसेला मंजुरी मिळालेचे पत्र खासदार राजन विचारे यांना प्राप्त झाले आहे. या बस खरेदीसाठी केंद्र शासनाकडून 60 टक्के अनुदान मिळणार आहे, तर उर्वरित 40 टक्के रक्कम महापालिकेला अदा करावी लागणार आहे.