वायू प्रदूषण रोखण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 36
नवी मुंबई : पनवेल पालिकेच्या हद्दीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने हवा शुद्धीकरण यंत्र बसवली आहेत. या यंत्रांमुळे रस्त्यावरील वाहनांकडून होणारे धुळीचे प्रदूषण नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.
हवेत धूलिकण उडू नये याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार खबरदारी घेण्याचे आदेश पनवेल पालिकेने इमारतींचे बांधकाम विकसकांना दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या पर्यावरण विभागाने बांधकाम स्थळपाहणी करून कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसीनंतर पुन्हा स्थळपाहणी करून ज्या विकसकांनी नियमांची पूर्तता केलेली नाही, अशा विकसकांवर कारवाई प्रस्तावित आहे. पण नगररचना विभाग कारवाईबाबत उदासीन असल्याने नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
पावसाळा संपताच हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीसोबत वायू प्रदूषणाला सुरुवात झाली आहे. पनवेल पालिकेच्या हद्दीतील खारघर, कळंबोली, रोडपाली, तळोजा, कामोठे आणि नवीन पनवेल भागात नागरिकांना रसायनाच्या वासाने हैराण केले आहे. पनवेलप्रमाणे राज्यातील प्रमुख शहरांची सारखीच अवस्था असल्याने उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे मारले आहेत. प्रदूषणकारी घटकांवर कठोर कारवाई आणि उपाययोजना करण्याचा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेने विकसकांना 260 पेक्षा अधिक नोटिसा बजावल्या आहेत. तसेच स्थळपाहणी करून कारवाईचा अहवाल तयार केला आहे. या अहवालावर कारवाई झालेली नाही. महापालिकेने शहरात गरजेनुसार हवेतील रसायने, घातक वायू आणि धूलिकण शोषून घेणारे हवा शुद्धीकरण यंत्रे उभारलेली आहेत.
येथे हवा शुद्धीकरण
- खारघर विभागात हिरानंदानी कॉम्प्लेक्स,कळंबोली विभागात रोडपाली सिग्नल,नावडे विभागात तळोजा आयजीपीएल नाका,पनवेल विभागातील पनवेल कोळीवाडा,पनवेल विभागातील हुतात्मा स्मारक गार्डन
- उपाययोजना
- पाण्याचे तुषार फवारणी
- खारघर, तळोजा, कामोठे,कळंबोली, पनवेलमध्ये वाहने फिरवली जातात.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai