स्थायी समिती सभापतीपदी मनोहर म्हात्रे

पनवेल ः पनवेल महापलिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे नगरसेवक मनोहर म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पनवेल महापलिकेत 30 जुलैला झालेल्या विशेष सभेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात मनोहर म्हात्रे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. 

पनवेल महापलिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीसाठी आज महापलिकेच्या सभागृहात विशेष सभा झाली. मावळते सभापती अमर पाटील यांच्या एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन सभापतीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया झाली. नवनियुक्त स्थायी सभापती मनोहर म्हात्रे यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, आयुक्त गणेश देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, यांच्यासह सभापती, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.