शिवशक्तीचा कर्तव्यनामा जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 09, 2026
- 39
शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सुरक्षिततेला प्राधान्य
नवी मुंबई ः शिवशक्तीच्या कर्तव्यनाम्यात नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माणसेना आणि शिवसेना उबाठा यांच्या शिवशक्तीचा कर्तव्यनामा बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. शहराचा विकास , दलालांना चाप, आरोग्य सेवा, शिक्षण, पर्यावरण, प्रदुषणाला आळा, महिलांची सुरक्षा याला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच वॉर्ड रेसिडेनशल प्रोटेक्शन सेल स्थापन करुन लोकांची फसवणुक टाळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही केवळ आश्वासने नसून ठाकरेंचा शब्द आहे आणि हा दिलेला शब्द कर्तव्य म्हणून पाळला जाणार असल्याची ग्वाही शिवसेना आणि मनसेच्या वतीने देण्यात आली.
वाशी येथील मर्चेंट जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात शिवसेना-मनसे शिवशक्तीचा कर्तव्यनामा जाहीर करण्यात आला. सध्या ठेकेदारांच्या सल्ल्यानुसार आणि अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मर्जीनुसार होत आहे. मात्र यापुढे कोणतीही विकासकामे करताना प्रत्येक वॉर्डमध्ये सर्वसामान्य नागरिकांची वॉर्डसभा घेऊन त्यांना पसंत असलेली कामेच केली जाणार आहेत. पुनर्विकासात राजकीय दलालांच्या टोळ्यांनी घुसखोरी करून नागरिकांना हैराण केले आहे. या दलालांनाही चाप लावण्याचे काम करण्यात येणार आहे. नवी मुंबईसाठी आरोग्य सेवेचे बजेट 230 कोटींवरून 500 कोटींपर्यंत वाढून आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. बंद असलेली सर्वच रुग्णालये तातडीने सुरू केली जाणार आहेत. ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र त्यातील एक टक्का पर्यटकही नवी मुंबईत येत नाही. त्यामुळे नवी मुंबई जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ निर्माण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा 111 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारला जाणार आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन, जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्ययन केंद्र व संत महात्म्यांचे तैल चित्र दालन, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उद्यान व प्राणी संग्रहालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा केंद्र, सरखेल कान्होजी आंग्रे शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वतंत्र कन्या अभ्यासिका, डॉ. आनंदीबाई जोशी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी, एपीजे अब्दुल कलाम बोटॅ निकल गार्डन, खाशाबा जाधव तालीम, द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल आदी वास्तूही शहरात उभारण्यात येणार आहेत. शिवसेना आणि मनसेच्या वतीने दिबांचा पूर्णाकृती पुतळा महापालिका मुख्यालयासमोर उभा करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai