बेलापुर मतदारसंघातून मिळणार आघाडी-आमदार मंदा म्हात्रे
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 09, 2026
- 50
नवी मुंबई ः महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर प्रभाग क्रमांक 27 आणि 28 मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आ. मंदाताई म्हात्रे मैदानात उतरल्या आहेत. या सभेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना व जनतेला संबोधित केले. बेलापुर मतदार संघातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विश्वास पाहता यावेळी या निवडणुकीत भाजपाचा विजय हा निश्चित आहे असा विश्वास आ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांच्या प्रचाराने जोर धरला आहे. सभा, रॅली, भाषणे, घोषणांचा आवाज सर्वत्र घुमत आहे. बेलापुर मतदार संघात जागावाटपावरुन भाजपमध्ये झालेल्या अंतर्गत वादाने येथील आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पंरतु पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा निर्णय घेतलेल्या आ. मंदा म्हात्रे यांनी बेलापूर प्रभाग क्रमांक 27 आणि 28 मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढाकार घेतला आहे. बेलापूर प्रभागात विकासकामे अधिक वेगाने पोहोचावीत, नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मार्गी लागाव्यात, यासाठी ठोस नियोजन आणि स्पष्ट दिशा देणे हेच माझे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांसमवेत प्रत्यक्ष मैदानात उतरून त्यांना मार्गदर्शन केले आणि कार्यकर्त्यांशी प्रचारसभा, प्रचार रॅली तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
बेलापूर प्रभाग क्रमांक 27 मधील तेजस्वी म्हात्रे, ज्योती पाटील, संतोष कोळी, प्रमोद जोशी या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ विद्या प्रसारक हायस्कूल मैदानात आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ‘भव्य प्रचार सभा’ उत्साहात पार पडली. या सभेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना व जनतेला संबोधित केले. मी बेलापूर मतदारसंघातील जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत असून, या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकासकामे, भाजपाचा लोकाभिमुख अजेंडा आणि आमदार म्हणून मतदारसंघात राबवलेले प्रकल्प हा विकासाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर येत्या 15 तारखेला नवी मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा दिमाखात फडकेल, याबाबत मला ठाम विश्वास आहे. बेलापूरचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी आणि नागरी सुविधा मजबूत करण्यासाठी भाजपाचे उमेदवार सक्षमपणे काम करतील, असा मला ठाम विश्वास असल्याचेत्यांनी ठामपणे सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai