पोशिर धरणातून 500 एमएलडी पाण्याची नवी मुंबईसाठी तरतूद
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 09, 2026
- 46
भाजपचा जाहीरनाम्यात शहराच्या पुढील 30 वर्षांच्या विकासाचे व्हिजन
नवी मुंबई ः महापालिका क्षेत्रात जोमाने होणाऱ्या पुनर्विकासामुळे नवी मुंबईकरांना भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पोशिर येथे बांधल्या जाणाऱ्या धरणातून 500 एमएलडी पाण्याची तरतूद आपण केली असल्याची घोषणा नाईक यांनी केली आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात नवी मुंबईकरांवर केल्याने निवडणुकीचा बाज बदलल्याची चर्चा नवी मुंबईत सुरु आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठीचा नवी मुंबई भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा गुरुवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार तथा निवडणूक प्रमुख डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई राज्यामध्ये विकासाच्या बाबतीत एक पाऊल पुढे असल्याचे सांगून दूरदृष्टीने विकासाची धोरणे राबवून नाईक यांनी नवी मुंबईचा विकास केल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले.
भाजपच्या जाहीरनाम्यात आरोग्य, शिक्षण, वाहतुक, पर्यावरण, रोजगार, आधुनिक पायाभुत रचना याला प्राधान्य दिलेआहे. शहराच्या पुढील 30 वर्षांचे व्हिजन तयार केल्याचे आ. गणेश नाईक यांनी सांगितले. नवी मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी पोशीर धरण बांधण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले. 25 वर्षे मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी वाढवणार नाही असा शब्द दिला होता तो पाळला. आता पुढील वीस वर्षे देखील मालमत्ता आणि पाणीपट्टी वाढवणार नाही असे ते म्हणाले. कर वाढ न करता ही शहराचा विकास मात्र होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
100 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि 500 खाटांचे नवीन रुग्णालय सुरु करणार, पीजी ते केजी शिक्षण मोफत देणार, नागरिकांच्या मागणीनुसार इंग्लिश आणि सीबीएसई माध्यमाच्या अतिरिक्त शाळा सुरू करणार, नवी मुंबईतल्या 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी 501 ते 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना 60 टक्के कर सवलत, सिडको सोसायट्यांमध्ये गरजे पोटी झालेली वाढीव बांधकामे नियमित करणार, वाहतूक कोंडीच्या भागांमध्ये मल्टीलेव्हल पार्किंगची सोय, नवी मुंबई परिवहन सेवेमधून ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवासाची सुविधा कायम ठेवू, महापालिकेची सर्व रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करू, जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ऑपरेशन थिएटर्स टप्प्याटप्प्यात रुग्णालयांमधून स्थापित करणार, घनसोली ते ऐरोली पामबिच मार्गाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यात नमुद आहे. तुर्भे ते खारघर रस्ते प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे, कोपरखैरणे ते विक्रोळी असा नवी मुंबईतून मुंबईत जाण्यासाठी उड्डाणपूल प्रस्तावित आहे तो देखील लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न, बिल्डर विरहित झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास जमिनीच्या मालकीसह करण्याचा प्रयत्न असणार आहे. झोपडपट्टी बांधवांना जमिनीच्या मालकी हक्कासह मोठी सुविधायुक्त घरे, जमिनीच्या मालकीसह एकसमान परवडणारा दर आकारून प्रकल्प ्रस्तांची घरे नियमित करणार, महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी महापालिकेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न, बचत गटांच्या उत्पादनांसाठी पालिकेच्या माध्यमातून मोक्याच्या जागा उपलब्ध करून देण्याचे धोरण, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र, नवी मुंबईतील सर्व तलाव सुरक्षित केले जातील, शहरातील हवामान शुद्ध रहावे यासाठी झिरो डस्ट पॉलिसी, सुनियोजित नवी मुंबईसाठी फूड ट्रक पॉलिसी, कूल रूफ पॉलिसी, फेरीवाला धोरण, मार्केट पॉलिसी, खेळाच्या मैदानाचे धोरण, मॉडर्न, होर्डिंग धोरण. एज्युकेशन पॉलिसी, नवी मुंबईतील पर्यावरण चांगले राहण्यासाठी हवेची गुणवत्ता सुधारणार ज्येष्ठांच्या मागणीनुसार विरंगुळा केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. सोलर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात येईल अशी आश्वासनांची खैरात या जाहीरनाम्यात पाहायला मिळत आहे.
- जनरेशन एक्स, वाय, अल्फा, मिलेनियल साठी....
कम्युनिटी को-वर्किंग स्पेस तसेच आधुनिक कन्टंट क्रिएटिव्ह स्टुडिओ, कम्युनिटी को-वर्किंग स्पेस,वर्क-फ्रॉम-होम, स्टार्टअप्स व डिजिटल कामांना चालना, लास्ट माइल कनेक्टिविटी, ई-साइकिल, ई-स्कूटर और फीडर बस सेवा, पार्किंग बुकिंग साठी डिजिटल सुविधा, स्ट्रेस रिलीफ सेंटस, आधुनिक शिशुगृह या सुविधा देणार असल्याचे जाहीर केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai