डॉ. आंबेडकर स्मारकात विचारांचा ‘जागर\'
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 04, 2023
- 444
नवी मुंबई ः ज्ञान हीच शक्ती या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार व्हावा यादृष्टीने पालिकेने सुरूवातीपासूनच विविध मान्यवर व्यक्तींच्या व्याखानांचे आयोजन करीत ऐरोलीतील डॉ. आंबेडकर स्मारकात ज्ञानजागर करण्याचा वसा जोपासला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत जागर 2023 या व्याख्यान शृंखलेचे सायं. 6 वा. आयोजन करण्यात आले आहे.
मागील दीड वर्षात सातत्याने विचारवेध या शिर्षकांतर्गत साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याठिकाणी करण्यात येत आहे. त्या सोबतीनेच मागील वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे औचित्य साधून ‘जागर 2022' ह्या मान्यवर व्यक्तींच्या विविध विषयांवरील व्याख्यानांच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन जयंतीपूर्वीच्या पंधरवड्यात करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांना श्रोत्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला होता. ‘जागर 2022' ची हीच वैचारिक परंपरा कायम राखत यावर्षीही ‘जागर 2023' या व्याख्यान शृंखलेचे सायं. 6 वा. आयोजन करण्यात आलेले आहे. या जागरामध्ये-सोमवार, 3 एप्रिल रोजी एबीपी न्यूज आणि एबीपी माझा चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचे सर्वव्यापी आंबेडकर या विषयावर व्याख्यान होणार आहे. 5 एप्रिल रोजी बीबीसी मराठी नवी दिल्लीचे मुख्य प्रतिनिधी व लेखक नामदेव काटकर (अंजना) हे माणसाच्या विकासातील वाचनाचे महत्व अधोरेखित करीत ‘वाचायचं कशासाठी? या विषयावर संवाद साधणार आहेत. 11 एप्रिल रोजी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत डॉ.नरेंद्र जाधव हे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : बहुआयामी प्रतिभावंत या विषयावरील व्याख्यानातून बाबासाहेबांच्या आभाळएवढ्या व्यक्तिमत्वातील विविधांगी पैलू उलगडणार आहेत. 13 एप्रिल रोजी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजविणारे युवापिढीचे शिलेदार नीरज टकसांडे, आनंद माणिक इंगळे, प्रफुल्ल शशिकांत, प्रवीण निकम, अविनाश उषा वसंत हे 5 मान्यवर भिमा तुझ्या जन्मामुळे या शिर्षकांतर्गत उपस्थितांशी सुसंवाद साधणार आहेत. याशिवाय ‘जागर 2023' अंतर्गत आणखी काही मान्यवरांच्या व्याख्यानांचे नियोजन सुरू असून त्यांच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai