Breaking News
मुंबई ः राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याविषयीची संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान निकालासंदर्भात टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाचे निकाल लागण्याचे संकेत सरन्यायाधीशांनी दिले आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले. 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे. त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण आपल्या आधीच पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. मात्र आज संध्याकाळी प्रकरण लिस्ट होतं का पाहावे लागेल.
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधिमंडळातच होईल, असं कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. पण हा निर्णय कुणाच्या अध्यक्षतेखाली होणार? विधानसभेचे तत्कालिन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ की सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर? याबाबत सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे. यावर उद्या निकालाची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai