दिव्यांग स्टॉल वाटपाला सुरुवात
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 09, 2023
- 459
330 स्टॉलचे विभागानुसार होणार वितरण
नवी मुंबई : दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई पालिकेच्या वतीने विविध योजना, उपक्रम राबविले जातात. त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध ठिकाणी 330 स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मागील दोन महिन्यांपासून रेंगाळलेल्या दिव्यांग स्टॉल वाटपाला अखेर सुरुवात झाली असून बेलापूरमध्ये 14 जणांना स्टॉल देण्यात आले आहेत. यानंतर ऐरोली येथे देण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने विभागानुसार वाटप करण्यात येणार आहे.
मागील वर्षभरापासून दिव्यांगाना स्टॉल उपलब्ध करून देण्याचे नियोजन आखण्यात आले होते. याकरिता दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या दिव्यांगांच्या स्टॉलकरिता सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार 17 ते 18 भूखंड देण्यात आले आहेत, अशी माहिती मालमत्ता विभागाने दिली आहे. स्टॉलची निर्मिती करतानाही दिव्यांगांच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध असून स्टॉलमध्ये दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी रॅम्पची व्यवस्था आहे. मात्र मागील कित्येक महिन्यांपासून पात्रतांची यादी पूर्ण असूनही दिव्यांगांच्या स्टॉलसाठी जागा निश्चित न केल्याने तयार स्टॉल वाशी, घणसोली, ऐरोली विभागात मोकळ्या भूखंडावर पडून होते. मात्र अखेर दिव्यांगांच्या स्टॉलसाठी जागा निश्चित करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने विभागानुसार दिव्यांगांना स्टॉल वाटप करण्यात येत आहे. बेलापूरपासून सुरुवात करण्यात आली असून त्यानंतर ऐरोलीत स्टॉल वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मालमत्ता विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली आहे.
विभाग दिव्यांग स्टॉल संख्या
- बेलापूर 14
- नेरुळ 54
- वाशी 57
- तुर्भे 16
- कोपरखैरणे 24
- घणसोली 57
- ऐरोली 90
- दिघा 18
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai