वाशी विभागात अतिक्रमण कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 17, 2024
- 354
नवी मुंबई ः पालिकेच्या कार्यक्षेत्रातील वाशी विभाग अंतर्गत जुहुगाव येथे सुरु असलेले अनधिकृत बांधकाम यापुर्वी तीनवेळा निष्कासित करण्यात आले होते. मात्र परंतु सदर बांधकामधारकाने सदरचे काम पुन्ह:श्च सुरु केल्याचे निदर्शनास आल्याने या बांधकामावर पालिकेने पुन्हा कारवाई केली आहे.
पालिकेने शहरातील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमण करुन केलेली बांधकामे यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विविध नोडमध्ये कारवाया करुन पदपथ, रस्ते मोकळे होत आहेत. परंतु काही ठिकाणी एकाच जागेवर बांधकामे पुन्हा पुन्हा उभी राहत असून कारवाई करण्यात पालिकेचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. त्यामुळे अशा बांधकामधारकांना कठोर दंड, शिक्षेची तरतूद करावी जेणेकरुन पुन्हा अतिक्रमणे उभी राहणार नाहीत अशी मागणी नागरीक करत आहेत. जुहुगावातही असाच प्रकार घडला आहे. अब्दुल वाहिद वामिक शेख, घर क्र. 0048, जुहूगांव, वाशी नवी मुंबई येथे महापालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करत असल्याचे निदर्शनास आले होते. या अनधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यांनी सदरचे बांधकाम हटविले नसल्याने सदर अनाधिकृत बांधकामावर वाशी विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून दि.24/08/2022, दि.04/01/2023 व दि.06/06/2023 रोजी अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले होते. परंतु सदर बांधकामधारकाने सदरचे काम पुन्ह:श्च सुरु केल्याचे निदर्शनास आल्यामुळे 15 जानेवारी 2024 रोजी सदरच्या बांधकामावर निष्काशनाची कारवाई करण्यात आली आहे. सदर धडक मोहिमेसाठी वाशी विभागाकडील सहा.आयुक्त अधिकारी, कर्मचारी, 6 मजूर, 2 ब्रेकर व घन, हातोडे यांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे अनधिकृत बांधकामांवरील कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai