पालिकेच्या सीबीएसई शाळांना शासन मान्यता
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 08, 2025
- 171
नवी मुंबई ः महापालिका क्षेत्रातील सामान्य घरातील पालकांच्या मुलांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सीवूडस आणि कोपरखैरणे येथे प्रत्येकी एक सीबीएसई शाळा कार्यान्वित असून त्यांना विद्यार्थी, पालकांकडून उत्तम प्रतिसाद लाभताना दिसत आहे. आता या दोन्ही शाळांना शासनाकडून कायम मान्यता मिळालेली असून ही मान्यता सन 2030 पर्यंत सीबीएसई बोर्डाशी संलग्न झालेली आहे.
मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेता यावे याकरिता या दोन सीबीएसई माध्यमांच्या शाळांची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये 4 ऑगस्ट 2018 रोजी शाळा क्रमांक 93, सीबीएसई स्कूल सीवूड सेक्टर 50 येथे तसेच शाळा क्रमांक 94, कोपरखैरणे, सेक्टर 11 येथे सुरू करण्यात आली. आता या दोन्ही शाळांना शासनाकडून कायम मान्यता मिळालेली असून ही मान्यता सन 2030 पर्यंत सीबीएसई बोर्डाशी संलग्न झालेली आहे. नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या दृष्टीने व येथील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद व आनंदाची गोष्ट असून यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाचा, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या सातत्यपूर्ण आढाव्याचा तसेच शिक्षण विभाग उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे व त्यांचे शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठपुराव्याचा महत्वाचा वाटा आहे.
शैक्षणिक वर्ष 2018 पासून प्रथम इयत्ता पहिलीच्या वर्गाची प्रवेश प्रक्रिया झाली. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत व आकांक्षा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने या दोन शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक पुढील वर्षात वर्गांतराने पुढील वर्ग जोडण्यात आले. सद्यस्थितीत उपरोक्त दोन्ही शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी या इयत्तांचे वर्ग भरविले जातात. दोन्ही शाळेत स्मार्ट टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक कक्ष, डिजिटल क्लास रूम, पूरक पोषण आहार, क्रीडा विषयक सुविधा, भौतिक सुविधा, गुणवंत व दर्जेदार शिक्षण देणारे शिक्षक उपलब्ध आहेत. या शाळांमधून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये येथील विद्यार्थी सहभागी झालेले असून अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवलेली आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत असून दोन्ही शाळांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
या दोन्ही शाळांना शासनाकडून कायम मान्यता मिळालेली असून यामुळे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. यामधील शाळा क्रमांक 94, कोपरखैरणे ही शाळा तर ‘पीएम श्री शाळा’ म्हणून केंद्र स्तरावर सन्मानित झालेली आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांच्या दिवसेंदिवस होणाऱ्या प्रगतीमुळे पालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारीही आनंदित आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीतील हा मानाचा तुरा असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शिक्षण विभागाचे व शाळांचे अभिनंदन केले आहे. या शाळांना शासन मान्यता लाभल्याने दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai