भ्रष्टाचारी कारभाराचा निषेध!
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2026
- 39
विकासासाठी बदल आवश्यक-खा. सुप्रिया सुळे
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त बेलापूर, नेरुळ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. यावेळी या नवी मुंबईत झालेल्या भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध त्यांनी केला. विकासाच्या विचाराला अधिक गती देऊन कृतीत आणण्यासाठी आणि पारदर्शकतेबरोबर भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी आपल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
पवार साहेबांच्या नेतृत्वात आणि काँग्रेसच्या साथीने मागील तीन दशकापासून नवी मुंबईच्या विकासाची वाटचाल सुरू होती. परंतु आता येथील सत्ताधारी एकमेकांवर पालिका लुटल्याचे आरोप करत आहेत. महापालिकेच्या कारभारासह राज्यातील विविध महानगरपालिकांबाबत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप परस्परांवर गंभीर आरोप करत असतील, तर हा प्रकार नवी मुंबईकरांसाठी चिंताजनक आहे. या आरोपांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबईत केली.
नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी गुरुवारी काढलेल्या बेलापूर ते सानपाडा प्रचार रॅलीदरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना खा. सुप्रिया सुळे यांनी, नवी मुंबईसह मुंबई महानगरपालिका आणि इतर महापालिकांमध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. हे सर्व प्रकार गांभीर्याने घेऊन केंद्र सरकारने चौकशीचे आदेश द्यायला हवेत. यासाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार असल्याचे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.
नवी मुंबईतील परिस्थितीवर विशेष भर देत, शहरातील नागरिकांना पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन हवे आहे. मात्र गेल्या काही वर्षांत महापालिकेचा कारभार लोकांच्या अपेक्षांवर उतरलेला नाही. नवी मुंबईचा विकास खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी व्हावा, यासाठी बदल आवश्यक असल्याचा संदेश खा. सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai