नाईकांच्या सभा तर शिंदेंचा रोड शो
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2026
- 59
नवी मुंबई ः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराचा धुरळा उडत आहे. त्याचबरोबर राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. मंत्री गणेश नाईक हे ऐरोली व बेलापुर मतदारसंघात प्रत्येक प्रभागात जाहीर सभा, प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात असून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत भव्य रोड शो आणि रॅलीद्वारे प्रचार करत आहेत. तसेच इतर पक्षांतर्फेही झेंडे, घोषणा आणि शक्तीप्रदर्शनामुळे प्रचारयुद्ध शिगेला पोहल्याचे दिसतआहे.
नवी मुंबई महापालिकेसाठी युतीची चर्चा फिस्कटल्यानंतर महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही पक्षांमध्ये थेट राजकीय लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून, विशेषतः भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांचा प्रभाव असलेल्या नवी मुंबईत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना बळ दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून, महापालिका निवडणुकीतील रंगत अधिकच वाढली आहे. ऐरोली आणि बेलापुर मतदार संघात झालेल्या रोड शोदरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक ताकदीवर विश्वास व्यक्त केला. “नवी मुंबईच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून, पालिकेत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे नेतृत्व देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे सांगत नवी मुंबईत सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
नवी मुंबईत भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्याकडून प्रत्येक प्रभागात जाहीर सभा, भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. नाईक यांच्याकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन होत असल्याने कार्यकर्ते, नेते व नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रचार सभेत विकास, पारदर्शक प्रशासन, सुरक्षित शहर, दर्जेदार पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि नागरिकाभिमुख सुविधा यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येतआहे. कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण उपस्थितीत ही सभा जन विश्वासाचे शक्तीप्रदर्शन ठरत आहेत. नवी मुंबईचा सर्वांगीण, सुरक्षित आणि विकासाभिमुख प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी नागरिकांनी भाजपला संधी द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात येत आहे. महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाचे नेते मंडळी प्रचारा दरम्यान शहराशहरांना भेटी देऊ लागले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai