अडकलेल्या मजुरांना ‘जनसाधारण’ चा आधार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 15, 2020
- 517
मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पहिला लॉकडाऊन सुरु झाल्यावर ट्रेन बंद झाल्या आणि अनेक जण अडकून पडले. या अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष जनसाधारण ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. 13 एप्रिल रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये विविध ठिकाणी अडकलेले लोक, स्थलांतरित मजूर यांना आपापल्या निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी जनसाधारण विशेष ट्रेन सुरु करण्याचे ठरवण्यात आले.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांचे, स्थलांतरित मजुरांचे अतिशय हाल होत आहे. त्यातच महाराष्ट्रातील लॉकडाऊन 16 दिवस वाढल्याने हातावर पोट असणारे मजूर चिंताग्रस्त आहेत. काम नाही तर दाम नाही. दाम नाही तर रोटी नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे. काही ठिकाणी लोकांनी मिळेल त्या मार्गाने प्रवास केला. काहींनी चालत, बाईकवर, कंटेनरमधून, दुधाच्या टँकरमधून आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. ट्रेन बंद झाल्याने मुंबईतील कुर्ला टर्मिनसमवर अनेक प्रवासी अडकले. तर दिल्लीत बस स्टॅण्डवर तुफान गर्दी उसळली होती. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी आणि मजुरांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं जाणार आहे. यासाठी रेल्वेची मदत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून मध्य आणि दक्षिण-मध्य विभागातून काही गाड्यांमधून मजुरांना आपापल्या गावाला पाठवण्यात येईल.
महाराष्ट्रातील मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे या दोन विभागांचा समावेश आहे.
नांदेड विभागातून 20 गाड्या मागितल्या आहेत. औरंगाबादमधून तीन हजार मजूर पाठवणार आहेत. हे लॉकडाऊनमधील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन ठरेल.
असा असेल प्रवास?
यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयांकडून माहिती संकलित करण्यात आली आहे. समजा लखनौला जाणारे मजूर असतील तर ते मजूर त्या डब्यात बसवले जातील, त्या डब्यांना बाहेरुन कुलूप लावले जाईल आणि हा डबा थेट लखनौला उघडेल, खिडक्या उघड्या असतील. मात्र आतमधून बाहेर पडता येणार नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai