ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 17, 2026
- 176
मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा; शिंदेपेक्षा ठाकरेंना पसंती
मुंबई ः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर अधिपत्य मिळवण्याचे भाजपचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेसोबत भाजपने 116 जागा मिळवल्याने मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 25 वर्षांपुर्वी शिवसेनेशी युती करुन मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्याचा त्यांचा मनसुबा 2026 च्या निवडणुकीत पुर्ण झाला आहे. या विजयामुळे ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लागला असला तरी त्यांना मनसेसह 71 जागांवर विजय मिळाल्याने मुंबईकरांनी शिंदेसेनेपेक्षा ठाकरेंवर विश्वास व्यक्त केला आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले होते. मुंबई महापालिकेत भाजप आणि ठाकरे अशी थेट लढाई झाली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या देशाची अर्थिक राजधानी मुंबई कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. मराठी माणूस, मराठी महापौर, देशाचे अदाणीकरण, मुंबईचे विलगीकरण हे भावनिक मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी आणले तरी ठाकरे बंधूंना मुंबई महापालिकेवरील आपला भगवा कायम ठेवण्यास यश मिळाले नाही. महायुतीने मुंबईत शंभरी पार केली असून त्यांना 116 जागा मुंबईकरांनी दिल्याने मुंबई महापालिकेवर कमळ फुलले आहे.
राज्यात गेली 30 वर्षे शिवसेना व भाजप यांची युती असून या युतीने गेली 25 वर्षे मुंबईवर निरंकुश सत्ता उपभोगली आहे. त्यामध्ये शिवसेनेचा मराठी मुद्दा आणि भाजपचे हिंदुत्व या दोन्ही मुद्यांचा फायदा सेनेला झाल्याने 25 वर्षे शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकत राहिला होता. परंतु, 2019 साली शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करुन राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरेंना धडा शिकवण्याचा विडा भाजपने उचलला होता. 2022 साली भाजपने शिवसेनेत उभी फुट पाडत 40 आमदारांचा नवा गट आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केला. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर शिंदेंना मुख्यमंत्री करुन राज्याची सत्ता काबीज केली. निवडणुक आयोगामार्फत नाव आणि चिन्ह हे शिंदे यांना बहाल करुन ठाकरे यांची चांगलीच कोंडी केली. तरीही, नवीन चिन्ह व नवीन नावाच्या जोरावर त्यांनी लोकसभा निवडणुकीत 19 खासदार निवडून आणले.
राज्याची सत्ता मिळाली असली तरी ठाकरेंचा जीव हा मुंबई महापालिकेत असल्याने ती जिंकण्यासाठी ते जंगजंग पछाडतील हे सर्वश्रुत होते. त्यातच शिंदे यांनी मुंबईतील 70 हुन अधिक नगरसेवक शिवसेनेत घेतल्याने ठाकरे यांच्याकडे उमेदवारच नसतील याची खबरदारी शिंदे यांनी घेतली तरी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ठाकरे यांनी मनसेशी युती करत चांगलीच टक्कर या महापालिका निवडणुकीत दिली आहे. अपुरा वेळ व साधनसामग्री असतानाही ठाकरे सेनेने भाजप व शिंदेसेनेशी चांगली लढत देत एकुण ???? नगरसेवक निवडून आणले आहेत. ठाकरे यांच्या महापालिकेवरील सत्तेला जरी भाजपने सुरुंग लावला असला तरी मुंबईत खरी शिवसेना ही ठाकरे यांचीच असल्याचा कौल मिळाल्याने वेगळा संदेश राज्यात गेला आहे. सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी जनतेच्या न्यायालयात मुंबईतील निवडणुकीत मात्र ठाकरेंची सेना शिंदेसेनेपेक्षा वरचढ ठरली आहे. मुंबईकरांनी ठाकरेंचे पारडे जड केले आहे. मुंबईत ठाकरेच हवेत किंवा मुंबई ठाकरेंची असे भावनात्मक वातावरण मराठी लोकांमध्ये होते. त्यामुळे शिंदेपेक्षा ठाकरेंच्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दिल्याने खऱ्या शिवसेनेचा दावा करणाऱ्या शिंदेंना झटका बसला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai