कोंकण विभागात एस.टी. सेवा पूर्ववत
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 19, 2022
- 697
नवी मुंबई : कोकण विभगातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर झाले आहेत. 50 टक्क्याहून अधिक एस.टी. वाहतूक सुरु झाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एस.टी. महामंडळाने दिली. 28 ऑक्टोबर 2021पासून राज्यातील जवळपास 92 हजार एस.टी. कर्मचार्यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एस.टी. सेवा ठप्प झाली होती. दि. 8 एप्रिल 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 425, रायगड जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 644, रत्निागरी जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 125 आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत 716 कर्मचारी संपसोडून कमावर हजर झाले आहेत. कोकणात लवकरच शंभर टक्के एस.टी. वाहतूक सुरु होईल, असे आगार प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai