3798 शाळांना जिओ टॅगिंगचे वावडे
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 27, 2025
- 65
10 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचे शिक्षण आयुक्तांचे आदेश
मुंबई : राज्यातील शाळांना भौतिक सुविधांसह शाळेच्या ठिकाणाचे जिओ टॅगिंग करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला होता. त्यानंतर आतापर्यंत जवळपास राज्यातील 1 लाख 4 हजार 367 शाळांचे मॅपिंग पूर्ण केले आहे. असे असताना दुसऱ्या बाजूला मात्र 3 हजार 798 शाळांनी याबाबतची कोणतीही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही विलंब होत असल्याने संबंधित शाळांना 10 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिले आहेत.
शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून सर्व सुविधांची माहिती एकत्रित करण्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेद्वारे महास्कूल जीआयएस मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. त्यात जिओ टॅगिंग ची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतच्या सूचना राज्यातील शाळांना एप्रिलमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यातील 1 लाख 4 हजार 367शाळांचे मॅपिंग पूर्ण केले असून 3 हजार 798 शाळांचे जिओ टॅगिंग अद्यापही शिल्लक आहे. आता या उर्वरित शाळांना येत्या दहा दिवसांत आपली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
याबाबत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांसह विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना एका परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. संबंधितांनी शाळांचे मॅपिंग का करण्यात आले नाही, शाळा बंद असतील तर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळणी करून याबाबतची माहिती ‘युडायस’मध्ये अद्ययावत करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. मॅपिंग न केलेल्या शाळांचा अहवाल सर्व शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करावा. त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी शिक्षण आयुक्तालयास एकत्रित अहवाल सादर करावा, असे निर्देशही शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिले.
मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये 4 हजार 85 इतक्या शाळा आहेत. यामध्ये मुंबई शहरमध्ये 1 हजार 742 शाळा असून, त्यातील 1 हजार 738 शाळांचे मॅपिंग झाले असून, अवघ्या 4 चार शाळांचे मॅपिंग शिल्लक आहे. तसेच उपनगरमध्ये 2 हजार 343 शाळांपैकी 1 हजार 906 शाळांचे मॅपिंग झाले आहे. तर 437 शाळांचे मॅपिंग शिल्लक आहे.
- ‘मॅपिंग न झालेल्या शाळांची जिल्हानिहाय संख्या
छत्रपती संभाजी नगरधील सर्वाधिक 477 शाळांचे मॅपिंग झाले नसून, त्याखालोखाल मुंबई उपनगर 437, नागपूर 403, यवतमाळ 326, नांदेड 302, कोल्हापूर 202, नाशिक 178, जालना 142, धुळे 132, सांगली 127, सोलापूर 100, बीड 94, पुणे 90, जळगाव 58, सातारा 56, ठाणे 34, लातूर 20, अमरावती 18, हिंगोली 16, सिंधुदुर्ग 11, अहिल्यानगर, गोंदिया व अकोला प्रत्येकी 10, परभणी, वाशिम व चंद्रपूर प्रत्येकी 8, वर्धा 7, रायगड 6, पालघर व रत्नागिरी प्रत्येकी 5, मुंबई शहर 4, बुलढाणा, धाराशीव, गडचिरोली, नंदूरबारमध्ये प्रत्येकी 1, भंडारा 0
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai