राहुल गांधींची संसदेत हजेरी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 07, 2023
- 543
नवी दिल्ली ः लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी सोमवारी संसदेत पोहोचले. राहुल गांधी 137 दिवसांनंतर संसदेत पोहोचले आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या खासदारांनी म्हणजेच त्यांचं स्वागत केले.
मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (4 ऑगस्ट) राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. यानंतर लोकसभा सचिवालयाकडून शुक्रवारी अधिसूचना जारी करुन राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आलं. संसद परिसरात पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लाडू खाऊ घातला. यानंतर खरगे यांनी बाकीच्या नेत्यांना लाडू भरवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांना सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. भारतातील लोकांसाठी आणि विशेषत: वायनाडच्या लोकांसाठी हा दिलासा आहे. भाजप आणि मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात जो काही वेळ शिल्लक आहे त्याचा वापर करुन विरोधी नेत्यांना लक्ष्य करुन लोकशाहीला बदनाम करण्याऐवजी खऱ्या कारभारावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर सचिन पायलट म्हणाले की, सत्याचा विजय झाला. जनतेचा आवाज पुन्हा संसदेत बुलंद होईल. राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्याने लोकशाही वाचवण्यासाठी आणि सार्वजनिक समस्या मांडण्याच्या लढ्याला नवं बळ मिळेल. उज्ज्वल भविष्याचा पाया रचून भारताला सक्षम बनवण्याच्या दिशेने सर्वजण एकत्रितपणे पुढे जातील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai