Breaking News
नवी मुंबई ः 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने 8 ते 15 मार्च या सप्ताहामध्ये स्त्री शक्तीचा जागर करीत सध्या कोरोनाबाधितांची पुन्हा वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन विविध ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये 18 वर्षावरील महिलांकरीता आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धांमध्ये
अशा 7 विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधील सहभागाकरिता नोंदणी करण्याची लिंक 11 मार्च 2021 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत खुल्या असणार आहेत. स्पर्धा सहभागकरिता अर्ज, नियम, अटी व शर्ती याची सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे फेसबुक पेज छचचउेपश्रळपश यावर उपलब्ध असून स्पर्धकांनी व्हॉट्स अॅप क्रमांक 9833540864 यावर त्यांची स्पर्धेकरिता तयार केलेली व्हिडीओ क्लिप / फोटो पाठवावयाची आहे. या स्पर्धांमध्ये दिघा ते सीबीडी बेलापूर या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणार्या महिला सहभाग घेऊ शकतात. याची स्पर्धकांनी नोंद घ्यावयाची आहे.
याशिवाय महिलांसंबंधी विविध विषयांवर निगडीत व्याख्यानांचे सप्ताहभर ऑनलाईन आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये
या विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या फेसबुक पेजला भेट देऊन महिला या उद्बोधक व्याख्यानांचा लाभ घेऊ शकतात. तरी जागतिक महिला दिनानिमित्त विविध अंगभूत गुणांना वाव देणार्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याकरीता महिलांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या छचचउेपश्रळपश या फेसबुक पेजला भेट देऊन स्पर्धांची माहिती जाणून घ्यावी व स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai