वायू प्रदूषण करणाऱ्या 7 बांधकामांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 30, 2026
- 30
नवी मुंबई ः शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर तात्काळ व प्रभावी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालय दिलेले आहेत. पालिकेने त्यावर तोडगा म्हणून बांधकाम मानक प्रणाली तयार केली आहे. या निमावलीचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामावर कारवाई करण्यात येते. वायु प्रदुषण करणाऱ्या बांधकामांना नोटीसा बजावूनही उपाययोजना न केल्याने पालिकेने अशा सात बांधकाम साईटचा कामे बंद करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये नामांकित विकासकांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे होणा ऱ्या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टिंग करीता अवलंबवायची ‘मानक कार्यप्रणाली ’ व बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषण दंडात्मक कारवाईबाबतची नियमावली मानक कार्यप्रणाली अन्वये दंडात्मक शुल्क भरणा करणेबाबत संबंधित विकासक व बांधकाम धारकांस कळविण्यात आलेले होते. तसेच ध्वनी, वायू प्रदूषण नियंत्रणाकरीता आवश्यक उपाययोजना केल्याबाबत खातरजमा करूनच काम करण्यात यावे. तसेच बांधकाम स्थळच्या सभोवताली 500 मीटर पर्यंतच्या परिसरात व रस्त्यांवर धूळ प्रदूषण होऊ नये याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी अन्यथा सुरु असलेले बांधकाम त्वरित बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल अशा आशयाच्या नोटीसा संबंधित विकासक यांना बजाविण्यात आलेल्या आहेत. तथापि, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दि. 24 जानेवारी 2026 रोजी सुरु असलेल्या बांधकाम / विकास कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता सदर पाहणीमध्ये पुढीलप्रमाणे त्रूटी आढळून आलेल्या होत्या.
- 1. बांधकाम प्रकल्पाच्या परिघाभोवती किमान 30 फूट उंच टिन धातूचे पत्रे लावणे आवश्यक असताना प्रकल्पावर त्यापेक्षा कमी उंचीचे टिन धातूचे पत्रे आढळून आले.
- 2. बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना सर्व बाजूने हिरव्या कापडाच्या ओल्या ज्यूट शीटच्या ताडपत्रीने बंद केलेले आढळून आलेले नाही.
- 3. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडींग आणि अनलोडींग करताना वॉटर फॉगींग केले जात नाही.
- 4. बांधकाम मजुरांनी मास्क, गॉगल्स, ॲप्रॉन इ, परिधान केलेले आढळून आले नाही.
- 5. बांधकाम स्थळाच्या सभोवतालच्या 500 मीटर पर्यंतच्या परिसरात व रत्यांवर धूळ प्रदुषण होऊ नये याकरिता पाणी फवारणी यंत्र कार्यान्वित असल्याचे आढळून आले नाही.
- 6. घनमाती / बांधकाम साहित्य इत्यादी वाहतूक करताना हिरव्या कपड्याने झाकलेले आढळून आले नाही.
- 7. या पाहणी दरम्यान बांधकाम स्थळाच्या ठिकाणी कोणीही जबाबदार प्रतिनिधी / व्यवस्थापक उपस्थित नव्हते.
धूळ व प्रदूषण रोखण्याकरिता विकासक व बांधकाम धारक यांचेमार्फत तातडीने उपाययोजना करणेबाबत आवश्यक आहे. परंतू या बाबत योग्य उपाययोजना केल्या नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर बांधकामे साईट्स सीलबंद करण्यात आलेल्या आहेत.
- मे. साई अमृत बिल्डर्स, भुखंड क्र. 16 व 17, सेक्टर 20, सानपाडा, नवी मुंबई.
- मे. मेट्रीक्स बिल्डर्स, भुखंड क्र. 10, सेक्टर 19, सानपाडा , नवी मुंबई.
- मे. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपर्स, भुखंड क्र. 12, सेक्टर 20, सानपाडा, नवी मुंबई.
- मे. कामधेनु ग्रीन, भुखंड क्र. 6 व 7, सेक्टर 19, सानपाडा, नवी मुंबई.
- मे. रॉयल पाम डेव्हलपर्स , भुखंड क्र. 9, सेक्टर 20, सानपाडा, नवी मुंबई.
- मे. कामधेनु लाईफ स्पेस, भुखंड क्र. 18 व 25, सेक्टर- 8, सानपाडा, नवी मुंबई.
- मे. सत्यम लाईफ स्पेस, भुखंड क्र. 07, सेक्टर 16ए, सानपाडा, नवी मुंबई.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai