‘रोजगारनिर्मिती’ गाड्या जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 30, 2026
- 33
नवी मुंबई ः मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांवर नवी मुंबई महानगरपालिकेने धडक कारवाई केली आहे. वाशी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांनी सात खाद्यपदार्थांच्या पिकअप गाड्या ताब्यात घेतल्या असून, संबंधितांकडून चार हजार 500 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
निवडणूक कालावधीनंतर शहरात अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले असून, रस्ते व पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेषतः बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि वर्दळीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले होते. याबाबत महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवर नागरिकांकडून वारंवार तक्रारी दाखल झाल्या होत्या.
वाशी रेल्वे स्थानक तसेच सेक्टर 9, 11, 15 व 16 परिसरात परवानगी नसताना रस्ते व पदपथांवर या गाड्या उभ्या केल्या जात होत्या. व्यवसायासाठी अधिकृत स्थळाची नोंद नसतानाही राजकीय दबावाच्या जोरावर वाहतुकीच्या मुख्य रस्त्यांवर गाड्या लावल्या जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. निवडणुकीनंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले असून, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांत धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai