सावधान..! शहरात लिडार येतोय
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 22, 2021
- 1057
नवी मुंबई ः महापालिका क्षेत्राचा संपुर्ण सर्व्हे करुन त्याचे लिडार तंत्रज्ञानाने आराखने बनविण्याचे काम अखेर मार्गी लागले असून शहर अभियंता विभागाने मेसर्स. सेन्सस टेक लि. या कंपनीला हा ठेका दिला आहे. या कंत्राटाची किंमत 22 कोटी रुपये असून हे काम पुर्ण झाल्यास पालिकेच्या वार्षित उत्पन्नात सूमारे 100 कोटी रुपयांची भर पडण्याची अपेक्षा शहर अभियंता विभागाला आहे.
लिडार तंत्रज्ञानाद्वारे नवी मुंबईचे सर्वेक्षण करण्याची निविदा तत्कालीन पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पुर्ण करुन स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवली होती. स्थायी समितीने सदर प्रस्ताव फेटाळल्याने पालिका आयुक्तांनी तो ठराव शासनाकडे विखंडनासाठी पाठवला होता. नवी मुंबईचे लिडार तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण झाल्यास अनेक मालमत्ता पालिकेच्या रडारवर येतील आणि पालिकेला अधिकृत आणि अनधिकृत बांधकाम निश्चित करण्यास सोपे होईल त्यामुळे तत्कालीन लोकप्रतिनिधींनी हा प्रस्ताव फेटाळल्याची चर्चा त्यावेळी होती.
शासनाने सदर ठराव विखंडीत केल्यानंतर शहर अभियंता विभागाने संबंधित ठेकेदार मे. सेन्सस टेक लि. यास कार्यादेश जारी केल्याचे सुत्रांकडून कळत आहे. यामध्ये ड्रोनद्वारे संपुर्ण शहराचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याच्या आधारे संपुर्ण शहराचे बेसमॅप बनवण्यात येणार आहेत. या मॅपवर ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलेल्या सर्व इमारती बसवण्यात येणार असून त्या बाबतचा अहवाल मालमत्ता विभागाकडून मागवण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे शहरातील मालमत्तांचे अचूक सर्वेक्षण होणार असून त्यामध्ये शहरातील अधिकृत घरे, अनधिकृत घरे तसेच झोपडपट्ट्यांची संख्या निश्चित होणार आहे. याचबरोबर शहरातील पदपथ, रस्ते, पथदिवे, गटर यांचेही सर्वेक्षण होणार असल्याने त्यांचेही अद्यावत नकाशे पालिकेला उपलब्ध होणार आहेत. पालिकेकडे 47 हजार झोपडपट्ट्या तसेच साडेतीन लाख मालमत्ता असल्याचा दावा मालमत्ताकर विभागाचा असून या सर्वेक्षणानंतर त्याच्यात 30 टक्के मालमत्तांची भर पडणार असल्याचा विश्वास शहर अभियंता विभागाने व्यक्त केला आहे.
लिडार तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण केल्यास रस्त्याची रुंदी, जंक्शनची रुंदी, शहरातील उपलब्ध नाले , भौगोलिक परिस्थिती याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तांत्रिक कामे करण्यास शहर अभियंता विभागाला सोयीचे होईल. शहरातील मालमत्ता व महापालिकेच्या मालमत्ता याची निश्चिती होऊन पालिकेच्या मालमत्ता करातून मिळणार्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल.- संजय देसाई, शहर अभियंता
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai