हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 17, 2023
- 370
नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 करीता संगणकीय सोडत 17 फेब्रुवारी 2023 रोजी सिडको भवन येथे यशस्वीरीत्या पार पडली. सिडकोतर्फे 24 ऑक्टोबर 2022 रोजी ही महागृहनिर्माण योजना सादर करण्यात आली होती. या योजनेतून नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये परवडणाऱ्या दरातील 7,849 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सिडकोतर्फे साकारण्यात आलेली ही आत्तापर्यंतची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची सर्वात मोठी योजना होती. नागरिकांतर्फे या योजनेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
सिडको महामंडळातर्फे परिपूर्ण कनेक्टिव्हिटी लाभलेल्या नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये या परवडणाऱ्या दरातील 7,849 सदनिका प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या योजनेतील गृहसंकुलांना नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी व खारकोपर रेल्वे स्थानकांसह महामार्ग, आअगामी एमटीएचएल महामार्ग यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उलवे नोडला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.
सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीसाठी वापरण्यात येणारी प्रणाली (सॉफ्टवेअर) ही पूर्णत: मानवी हस्तक्षेपविरहित आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संगणक विभागाकडून या प्रणालीची तपासणी करण्यात आली आहे. महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 च्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या श्रेीींंशूी.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai