नवी मुंबई, पनवेलमध्येही संपाचे पडसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 15, 2023
- 421
नवी मुंबई ः जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील अनेक भागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे पडसाद नवी मुंबईत उमटले. नवी मुंबईतील कोकण भवन येथील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला, तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपात थेट सहभागी न होता संपाला पाठींबा म्हणून काळ्या फिती लाऊन कामकाज केले.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मागणीसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. 17 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होती असे सांगण्यात आले होते. नवी मुंबईत मिनी मंत्रालय म्हटले जाणाऱ्या कोकण भवनातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. सकाळी साडेदहा आकाराच्या सुमारास घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणी 28 विभागांतील सुमारे 2 ते अडीच हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता. कोकण भवनमधील संप 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला.
पनवेल तहसील, वन विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येत संपात सामिल झाले होते. पनवेलच्या महसूल विभागातील शंभर टक्के कर्मचारी सामिल झाल्याने कचेरीतील कामकाज पूर्णपणे ठप्प होते. पनवेल महापालिकेतील कर्मचारी संपापासून दूर होते, तर राज्यव्यापी बेमुदत संपात महसुली कर्मचारी मोठ्या प्रमाणात सामिल झाल्याने पनवेल शहरातील तलाठी कार्यालयाचे दार कुलूपबंद होते.
उरण नगरपरिषद व नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेने या बेमुदत संपात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याहूनही अधिक तीव्र लढा यापूढे उभारण्यात येईल. दिवसरात्र काम करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा, सुविधा मिळाल्याच पाहिजेत. त्यांचे हक्क व अधिकार शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे. अन्यथा राज्यात याचे तीव्र प्रतिसाद उमटतील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai