विरार-अलिबाग प्रकल्पाचे भुसंपादन सप्टेंबरपासून
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 11, 2023
- 366
नवी मुंबई : विरार-अलिबाग बहूउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या भुसंपादनाचे निवाडे 15 सप्टेंबरपासून जाहिर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. भूसंपादन करतांना आवश्यक असणाऱ्या विविध विभागांच्या समन्वयाने हे काम करावयाचे आहे असे ही डॉ. कल्याणकर म्हणाले.
विरार-अलिबाग बहूउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या भुसंपादन अधिकाऱ्यांची कार्यशाळा गुरुवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय सहसंचालक राधेशाम मोपलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण भवन येथे पार पडली. विरार-अलिबाग बहूउद्देशीय मार्गिका 128 कि.मी. लांबीचा असून, यात 16 मार्गिका राहणार आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास 1300 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. भूसंपादनासाठी 22 हजार 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी 17 हजार 500 कोटी रुपये भूसंपादनासाठीचा लाभ देण्यासाठी उपलब्ध आहे अशी माहिती डॉ. कल्याणकर यांनी यावेळी दिली. भूसंपादनाचे निवाडे जाहिर करण्याचे काम विहित वेळेत सर्व यंत्रणांनी करावे, तसेच निवाडे देण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोरपणे अवलंब करावा, असे ही यावेळी सांगण्यात आले. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत बाजारमूल्य निश्चित करणे, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 या कायदेतील भूसंपादन तरतूदी आणि भूसंपादन प्रक्रियेतील विविध बाबींवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
‘वॉर रुम'ची स्थापना
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या महत्त्वकांशी प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी, यासाठी विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात कोकण भवन येथे ‘वॉररुम' सुरु करण्यात येणार आहे. भूसंपादनाचा मोबदला त्वरेने देण्यासाठी विहित कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai