Breaking News
दिग्गजांना पुन्हा संधी; महाविकास आघाडीची प्रतिक्षा
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी यंदा पहिल्यांदाच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटे की टक्कर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येत असून महायुतीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. महायुतीने आत्तापर्यंत 182 उमेदवारांची यादी जाहीर केली.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी महायुतीकडून भाजपने 99, शिवसेनेनं 45 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 38 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महायुतीमधील भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. तर, काही विद्यमान आमदारांचे तिकीटही कापण्यात आले. त्यानंतर, शिवसेना शिंदे गटाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तसेच, काही ठिकाणी घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. आता, अजित पवारांनी 38 उमेदवारांची राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली असून आमदार सुनिल टिंगरेंना वेटिंगवर ठेवलं आहे. तर, विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापण्यात आलंय. त्यामुळे, महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मिळून आत्तापर्यंत 182 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाविकास आघाडीकडून अद्याप एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात न आल्याने सर्वांना महाविकास आघाडीच्या यादीची प्रतिक्षा आहे. त्यातच, महायुती व महाविकास आघाडीशिवाय इतरही पक्षांनी व आघाड्यांनी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामध्ये, मनसेनं 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यापूर्वी, मनसेकडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे, आता महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी
शिवसेना शिंदे गटाची पहिली 45 उमेदवारांची यादी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai