फडणवीसांचं ऐकून माझ्या नादी लागू नका
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 08, 2024
- 465
आरक्षणाच्या मुद्यावरुन जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
जालना : राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारातील एका सभेत बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांना लक्ष केले. मनोज जरांगे मुंबईपर्यंत आले, गुलाल उधळला, आरक्षण मिळाल्याची घोषणा झाली. पण, अद्यापही आरक्षण मिळालेलं नाही अशी उपरोधीक टिका त्यांनी जरांगेंच्या भुमिकेवर केली. त्यावर जरांगे यांना विचारले असता राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत फडणवीसांचं ऐकून या लफड्यात पडू नका असा इशारावजा सल्ला दिल्याने पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
जालना येथे राज ठाकरे यांची त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे उगम स्थान मराठवाडा असल्याने या विषयाला स्पर्श करण्याचा मोह राज ठाकरे यांना आवरता आला नाही. मनोज जरांगे मुंबईपर्यंत आले, गुलाल उधळला, आरक्षण मिळाल्याची घोषणा झाली. पण, अद्यापही आरक्षण मिळालेलं नाही. मी अगोदरच सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तो विषय राज्य सरकारचा नाही, असे राज ठाकरेंनी सभेत म्हटले.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडली आहे. ठाकरेंच्या या वक्तव्याबाबत जरांगे पाटलांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. जरांगे पाटील म्हणाले की, त्यांना काय पंचायत पडलीय हे मला कळना, त्यांना मानणारा वर्ग आहे आमचा. देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून राज ठाकरेंनी या लफड्यात पडण्याची गरज नाही. तुम्हाला सांगणं आहे, हे रागारागात नाही. तुम्ही माझ्या नादी लागू नका, यानंतर तुम्ही आरक्षण विषयावर बोलू नका, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. समाजाचं अस्तित्व कसे वाढवायचे हे मला चांगले माहिती, तुमच्यासारखं मी अस्तित्व गमवणारा नाही. 57 लाख नोंदी, दोन कोरड मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. आमच्या भानगडीत न पडता समाजाची तुम्ही नाराजी घेऊ नये, इथून पुढे तुम्ही आरक्षणावर बोल नये एवढीच माझी अपेक्षा आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
जरांगे पाटील यांच्या या पलटवाराला राज ठाकरे काय उत्तर देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध जरांगे पाटील हे वाक्युद्ध राज्यातील जनतेला ऐकायला मिळेल.
- मराठा समाजाची भूमिका 10 तारखेला सांगू
10 तारखेला मी समाजाला काय सांगायचे हे मी समाजाला सांगणार आहे. समाज काहीही करू शकतो, आम्ही किती दिवस अत्याचार सहन करायचा, असे म्हणत विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने समाजाची भूमिका 10 तारखेला कळून येईल. मतदानाच्या 2 दिवस अगोदर जरी आम्ही आमची भूमिका सांगितली तरी समाजाला समजून येईल, असेही जरांगे यांनी म्हटले. - राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांना मी भेटायला गेलो होतो त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली होती. आरक्षणाचा विषय हा महाराष्ट्र राज्यापुरता नसून देशभराचा विषय आहे. प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या जातीचे प्रश्न पुढे येतील...हे होणार नाही. आरक्षण देणाऱ्यांना विचारा कसे देणार...ते देऊ शकत नाही...कोणतेही राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही...जी गोष्ट घडू शकत नाहीत... भेटू शकत नाहीत त्यासाठी आपण एकमेकांमध्ये भांडत आहोत, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai