 
                                    		
                            आता जबाबदारी मतदार राजाची
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2024
- 545
लोकशाहीच्या उत्सवासाठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.
- राज्यात 9.7 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
 विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघातील सुमारे 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष 5 कोटी 22 हजार 739, तर महिला मतदार 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतक्या आहेत, 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.
- राज्यात 4.69 कोटी महिला मतदार
 राज्यात 4,69,96,279 महिला मतदार आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. दिव्यांग () मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील ( ) मतदारांची संख्या 1,16,170 आहे.
- राज्यात एकूण 4136 उमेदवार  
 राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण 4 हजार 136 उमेदवार आहेत. ज्यामध्ये 3,771 पुरूष, 363 महिला आणि तर अन्य 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
- मतदानासाठी 2,21,600 बॅलेट युनिट
 राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 1,00,186 इतक्या मतदान केंद्रांसाठी 2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 व्हीव्हीपॅट (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5166 बॅलेट युनिट, 5166 कंट्रोल युनिट व 5165 व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण 185 विधानसभा मतदाररसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर 100 मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.
- 1  लाखांहून अधिक मतदान केंद्र सज्ज
 विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता येण्यासाठी राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे - 6 हजार 955, नाशिक 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.
महाराष्ट्रातील 241 विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र राहणार आहेत. सहायक मतदान केंद्रांची संख्या 241 इतकी आहेत. मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
- आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष
 यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
मतदान केंद्रांची संख्या जिल्हानिहाय
- पुणे - 8462
- मुंबई उपनगर - 7579
- ठाणे - 6955
- नाशिक - 4922
- नागपूर 4631
- अहमदनगर - 3765
- सोलापूर - 3738
- जळगाव - 3683
- कोल्हापूर - 3452
- औरंगाबाद 3273
- सातारा - 3165
- नांदेड 3088
- रायगड 2820
- अमरावती 2708
- यवतमाळ - 2578
- मुंबई शहर - 2538
- सांगली 2482
- बीड 2416
- बुलढाणा 2288
- पालघर 2278
- लातूर - 2143
- चंद्रपूर - 2077
- अकोला 1741
- रत्नागिरी 1747
- जालना 1755
- धुळे 1753
- परभणी 1623
- उस्मानाबाद - 1523
- नंदूरबार 1434
- वर्धा 1342
- गोंदिया 1285
- भंडारा - 1167
- वाशिम 1100
- हिंगोली - 1023
- गडचिरोली - 972
- सिंधुदुर्ग 921
- विधानसभा निवडणुकीसाठी 2 लाखांहून अधिक शाईच्या बाटल्यांची तरतूद
 विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे 2 लाख 20 हजार 520 शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदार संघांमध्ये 1 लाख 427 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी 2 शाईच्या बाटल्या याप्रमाणे 2 लाख 854 शाईच्या बाटल्यांची संख्या होते. 2 लाख 854 शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण 2 लाख 20 हजार 520 शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.
- 426 मतदान केंद्र ‘महिला नियंत्रित’ 
 केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त 45 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये 33, गोंदिया 32 आणि सोलापूर 29, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.
 महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेतली आहे.
 जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर 12, अकोला 6, अमरावती 8, औरंगाबाद 13, बीड 8, भंडारा 8, बुलढाणा 7, चंद्रपूर 9, धुळे 5, जालना 6, कोल्हापूर 10, लातूर 6, मुंबई शहर 12, नागपूर 13, नांदेड 9, नंदुरबार 4, उस्मानाबाद 4, पालघर 6, परभणी 8, पुणे 21, रायगड 9, रत्नागिरी 6, सांगली 8, सातारा 17, ठाणे 18, वर्धा 9 आणि यवतमाळ 7 असे असणार आहेत.
 
-  1950 क्रमांकाची हेल्पलाइन 
 निवडणूकविषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
                                    
                            Stock Market by TradingView
                                
                             
                                 
                                     
                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
                                             
                                                     
                                                     
                                                     
                                                    
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai