 
                                    		
                            शिवसेना-राष्ट्रवादी मुळ पक्ष कोणाचा?
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2024
- 690
मुंबई ः शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शकले होवून प्रत्येकजण माझाच पक्ष खरा असे सांगत आहेत. न्यायालयाने निकाल दिला नसल्याने आपण आता जनतेच्या न्यायालयात दाद मागू असे उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी वारंवार सांगितले आहे. त्यामुळे 23 तारखेला होणाऱ्या मतगणनेत कोणाचे जास्त आमदार निवडून येतात यावरुन मुळ पक्ष कोणाचा हे निश्चित होणार असल्याने चारही पक्षाच्या नेत्यांमध्ये धडकी भरली आहे.
जुन 2022 मध्ये शिंदे यांनी 40 आमदार सोबत घेवून शिवसेना पक्षावर दावा ठोकला. शिंदे यांची मागणी रास्त ठरवत केंद्रिय निवडणुक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह शिंदे यांना बहाल केले. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्याबाबतची याचिका प्रलंबित आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला. केेंद्रिय निवडणुक आयोगाने मागील निर्णयाची री ओढत पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार यांना बहाल केले. शरद पवार यांनीही याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून तीही याचिका प्रलंबित असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी नक्की कोणाची हा निर्णय अद्यापपर्यंत लागला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपण जनतेच्या न्यायालयात जावून आपला हक्क्क सिद्ध करु अशी भुमिका घेतली होती.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, शरद पवार व एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी 80 हून अधिक उमेदवार राज्यात उभे करुन जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट अजित पवार यांनी 59 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले हेोते. त्यामुळे वरील चारही पक्षांचे किती आमदार निवडून येतात याकडे आता पक्षनेत्यांसह कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.
जनतेच्या मनातील प्रश्न
- उद्धव ठाकरे यांचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षापेक्षा कमी निवडून आल्यास ते शिंदे यांचाच पक्ष मुळ शिवसेना म्हणून मान्य करतील का?
- उबाठाचे आमदार जास्त आले तर ते शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचा हे शिंदे मान्य करतील का?
- शरद पवार यांच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यास अजित पवार शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करतील का?
- जनतेने निकाल मतपेटीत बंद केला असून तो चारही पक्षाचे नेते स्विकारतील का?
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
                                    
                            Stock Market by TradingView
                                
                             
                                 
                                     
                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
                                             
                                                     
                                                     
                                                     
                                                    
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai