गुकेश ठरला विश्वविजेता
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2024
- 349
बुद्धिबळाच्या पटावर चीनच्या खेळाडूला चेक मेट
मुंबई : भारताचा गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव करत हा किताब पटकावला आहे. डी गुकेश विश्वनाथन आनंदनंतर गुकेश आता भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने या गॅरी कास्पोरोव्ह याचा विक्रमही मोडला. गुकेशची कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
गुकेश हा सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. तसेच अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या आधी विश्वनाथन आनंद 2012 मध्ये बुद्धिबळ चॅम्पियन बनला होता. गुकेशने याआधी वयाच्या 17 व्या वष ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती. आता गुकेशने चीनच्या लिरेनचा 14 डावानंतर 7.5-6.5 अशा गुणांनी पराभव केला. बुद्धिबळाच्या या प्रकारातील जागतिक क्रमवारीत 46व्या स्थानावर असणारा गुकेश क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या डिंगसमोर किती टिकाव धरेल याची कोणालाच खात्री नव्हती. त्यामुळे गुकेशने बरोबरीसाठी वारंवार सहज वाटणाऱ्या परिस्थितीतही डिंगसमोर अडचणींचे डोंगर उभारण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. नैराश्यग्रस्त डिंग अखेर कोलमडला आणि त्याने 55व्या खेळीत घोडचूक केली. नेहमी मख्ख चेहऱ्याने खेळणाऱ्या गुकेशचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना आणि त्याच्या चेहेऱ्यावर पुसट हसू उमटले. डिंगलाही आपल्या हातून घडलेल्या प्रमादांची जाणीव झाली, पण वेळ निघून गेली होती.
- कोण आहे डी गुकेश?
डी गुकेश यांचे पूर्ण नाव डोमराजू गुकेश असून तो चेन्नईचा रहिवासी आहे. गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या 7 व्या वष बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले. नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत तसेच ते चेन्नईमध्ये होम चेस ट्यूटर आहेत. त्यांच्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले. गुकेशचे वडील डॉक्टर असून आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai